Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ मार्च, २०२२

वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी अलर्ट...! वाचा काय म्हणाले श्राइन बोर्ड



श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाने भाविकांसाठी अलर्ट जारी केला आहे. प्रवाशांना बनावट वेबसाइट वरून बुकिंग न करण्याचे आव्हान करण्यात आले. वैष्णो देवी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अनेक भाविकांची फसवणूक झाल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत.वैष्णोदेवीच्या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक करणारे भक्तांची फसवणूक करत आहेत.

हे ठग भक्तांना हेलिकॉप्टर बुकिंग सह अनेक सेवा देतात आणि हजारो रुपयांची फसवणूक करतात.त्या तक्रारीची दखल घेत वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने अशा बनावट ऑनलाइन सेवा आणि वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी गुगलला पत्र लिहिले आहे. सायबर क्राईम मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध