Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ मार्च, २०२२

अर्थसंकल्प अधिवेशनात पुरवणी मागणीवर चर्चा करताना साक्री विधानसभेच्या आमदार सौ, मंजुळाताई गावित,



 साक्री विधानसभा उपजिल्हा रुग्णालयाच्या तरतुदी मागणीवर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. आज माझ्या साक्री मतदार संघात उपजिल्हा रुग्णालय साक्री जिल्हा धुळे येथील शंभर काेटी मुख्य इमारत सुधार सुधारित कामासाठी येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या या साक्री मतदार संघात साक्री येथे सध्या 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे माझ्या मतदारसंघातील लोकांना पुणे, नाशिक, मुंबई, जळगाव, गुजरात या शहरांकडे जावे लागते त्यामुळे पेशंटचे खूप हाल होतात अध्यक्ष महोदय सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय संकीर्ण 2012 मध्ये या ग्रामीण रुग्णालयाचे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलेले आहे. अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागाने व जिल्हा शल्यचिकित्सक धुळे यांनी सुधारित अंदाजपत्रक आराखडे तयार करून आपल्या विभागाकडे सादर केलेले आहे तरी अध्यक्ष महोदय आपणास विनंती करते तीन माझ्या मतदारसंघातील साक्री येथील उपजिल्हा रुग्णालय मुख्य इमारत बांधणीसाठी 52 कोटीची निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात पिंपळनेर हे सर्वात मोठे गाव आहे स्वतंत्र तालुका निर्मिती मध्ये पिंपळनेर गावाचे नाव आहे पिंपळनेर येथे आजमितीस ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे या इमारतीचे बांधकाम 2009 10 मध्ये झालेले असून इमारतीचे क्षेत्रफळ फक्त 830  चौरस मीटर आहे ग्रामीण रुग्णालयातील तीस खाटांचे क्षमता आहे अध्यक्ष महोदय पिंपळनेर गावाच्या आजूबाजूच्या सर्व परिसरात गोर गरीब आदिवासी मोलमजुरी करणारे लोकांची संख्या जास्त असून या लोकांना या ग्रामीण रुग्णालय याचा उपयोग होतो परंतु सोयीसुविधा अपुऱ्या पडत असल्याने लोकांची गैरसोय होत असते अध्यक्ष महोदय माझी आपणास विनंती आहे पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करणे यासाठी 8 कोटीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते, धन्यवाद

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध