Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
लाचखोर अधिकाऱ्यांचे होणार तात्काळ निलंबन,राज्य सरकार चा नवीन आदेशामुळे लाचखोरांचे धाबे दणाणले
लाचखोर अधिकाऱ्यांचे होणार तात्काळ निलंबन,राज्य सरकार चा नवीन आदेशामुळे लाचखोरांचे धाबे दणाणले
राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचेची मागणी केल्याची सिद्ध करणाऱ्या पुराव्यांच्या आधारे भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. त्यामुळे लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाते. पुढे अशा प्रकरणात संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर प्रकरणपरत्वे निलंबनाची,बडतर्फीची कारवाई होणे अपेक्षित आहे.
परंतु बऱ्याच प्रकरणांत निलंबनाच्या कारवाईऐवजी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली केली जाते,तसेच,
महानगरपालिका,नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये अनेक प्रकरणे योग्य कारवाईशिवाय प्रलंबित ठेवण्यात येत आहेत,अशी माहिती समोर आली आहे.
त्यामुळे महापालिका,नगरपालिकांमधील भ्रष्टाचाराला आळा घालणे व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा धाक निर्माण करणे, यासाठी राज्य शासनाने कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
जारी केलेल्या आदेशानुसार,लाचलुचपत प्रकरणात अटकेचा कालावधी ४८ तासाहून अधिक असल्यास अटकेच्या दिनांकापासून मानीव निलंबनाचे आदेश काढणे अनिवार्य आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करणे आवश्यक आहे. प्रकारणाचे गांभीर्य व पुराव्यांची सद्यस्थिती पाहून तात्काळ निलंबनाबाबत निर्णय घ्यावा, केवळ अटक झालेली नाही,या कारणास्तव सरसकट सर्व प्रकरणी निलंबन नाकारण्यात येऊ नये, असे परिपत्रकात म्हटले आहे.
त्याचबरोबर निलंबनानंतर ९० दिवसांच्या कालावधीत विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करुन संबंधितांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.लाचेची रक्कम घेताना ज्या कर्मचाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले असेल, त्याला सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात येणार आहे.
राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाच प्रकरणात एखाद्या अधिकारी व कर्मचाऱ्याला अटक झाली नाही, एवढे कारण देऊन या पुढे निलंबनाची कारवाई थाबंविता येणार नाही.या आदेशामुळे लाचखोरीला नक्की आळा बसेल,अशी आशा व्यक्त होत आहे.मात्र केवळ लाच मागितल्याच्या आरोपावरुन निलंबनाची कारवाई करु नये,असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
या आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी, एखाद्या शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री किंवा ९९३०९९७७०० या व्हाट्सअप्प क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील काटवान परिसरात राजधर देसले माऊली नावाचा झंझावाती कारकीर्द नव्या गट रचनेनंतर म्हसदी किंवा दात्तर्ती गटातून रणशिंग फुंकणार...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला असताना त्या आदेश...
-
शुक्रवार दि. 25/07/2025 रोजी सकाळी 10:45 वा. श्रावण मासारंभ निमित्त या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण या शुभप्रसंगी सहकुटुंब सहप...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याच्या जानवे जंगलाच्या हद्दीत कवटी हाडे आणि अडीच महिन्यांपूर्वी सुरत येथील हरवलेल्या महिलेचे आधार कार्ड आढळून आले ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक होत रस्त्यावर उतरून गुरुवार...
-
परंडा दि. २१ तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काळेवाडी या लहानशा खेडेगावात अंत्यसंस्कारासाठी देखील मूलभूत सुविधां...
-
निजामपुर पोलीस स्टेशनला आजपावेतो दाखल असलेल्या गुन्हयामधील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणेकरीता मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे. यांच...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याच्या जानवे जंगलाच्या हद्दीत कवटी हाडे आणि अडीच महिन्यांपूर्वी सुरत येथील हरवलेल्या महिलेचे आधार कार्ड आढळून आले ...
-
नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक ऋणानुबंध अधिक बळकट करणारी 'संत नामदेव घुमान यात्रा' यंदा १...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा