Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ मार्च, २०२२

धुळे जिल्ह्यातील कॉग्रेस पक्षाची वाताहत होत असताना ,धुळे ग्रामीण चे विकास पुरुष आमदार कुणाल पाटील यांची विकास कामाची जोरदार सुरुवात



धुळे तालुक्यातील निमगुळ ते नवे गाव खोरदड रस्त्यावरील बोरी नदीवर पूल व्हावा म्हणून गेले अनेक वर्षे आमचा पाठपुरावा सुरु होता. पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्यानंतर याठिकाणी अनेक अपघात घडले, जीवित हानी, पशु हानी झाली. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. ग्रामस्थांनी या ठिकाणी पूल व्हावा म्हणून आग्रही मागणी केली होती आणि अतिशय रास्त मागणी असल्याने आमचा पाठपुरावा सुरू होता. विधिमंडळाच्या सभागृहात आवाज उठवला, कपात सूचनेच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी मंजुरी दिली मात्र ऐनवेळी नाबार्ड कर्जसहाय्य योजनेत हा पूल समाविष्ट करण्यात आला आणि फक्त 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, 3 कोटी निधीतून ग्रामस्थांना अपेक्षित पूल बांधला गेला नसता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धुळे येथील अधिकाऱ्याने वेळेवर आमच्या लक्षात आणून दिल्यामुळे शेवटच्या क्षणी मंत्री महोदयांकडे जाऊन दीड कोटी रुपये वाढवून घेतले. त्यानुसार 22 फेब्रुवारी 2021 रोजी या कामाला 4 कोटी 49 लक्ष 88 हजार रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. आज या पुलाचे भूमिपूजन केले. भूमिपूजन विधी करत असतांना याठिकाणी पुरात वाहून गेलेल्या दुर्दैवी व्यक्ती, जनावरे डोळ्यासमोर दिसत होती. अनेकदा पुरामुळे घडलेल्या अपघातानंतर सांत्वन भेट द्यायला आलो होतो, त्या त्या वेळी ग्रामस्थांनी केलेला आक्रोश, त्यांचे दुःख पाहिलेले होते, ते आज डोळ्यासमोर येत होते मात्र मनात एक समाधान होते, आपल्या प्रयत्नांना यश मिळाले, त्यामुळे लवकरच हा पूल तयार होईल आणि या पंचक्रोशीतील माझ्या जनतेला कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही. आजच्या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, पंचक्रोशीतील सरपंच आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. दुर्दैवी घटनेनंतर ज्या चेहऱ्यांवर आक्रोश पाहिला होता, तेच चेहरे आज आनंदाने फुलली होती. माझ्यासाठी हे उच्चकोटीचे समाधान होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध