Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिवगौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय शिवगौरव उत्कृष्ट शिवशाहीर सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे यांना जाहीर
शिवगौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय शिवगौरव उत्कृष्ट शिवशाहीर सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे यांना जाहीर
शिवगौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय शिवगौरव उत्कृष्ट शिवशाहीर सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष श्रीयुत शांताराम काकडे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील व्यक्तींना दिला जातो.
दि.२७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शेरीचिखलठाण ता.राहुरी येथे एका समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
भारतभर इतर पुरस्कार खुप मिळाले पण हा पुरस्कार राहुरी तालुक्यातुन मिळत आहे म्हणजे घरातील मानसांची कौतुकाची थाप पाठीवर पडत आहे. असे शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे यांनी सांगितले.
शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांनी शाहिरीतून व कीर्तनातून शिवरायांचे कार्य महाराष्ट्रात देशात तसेच परदेशातही पोहोचवले आहे. तसेच सिन्नर येथे अंध अपंग निराधार इत्यादी समाजातील दुर्लक्षिलेल्या घटकांसाठी शिवाश्रमाची बांधणी करून लोकार्पण केले आहे. या कार्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे. शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांचे आकाशवाणी दूरदर्शन तसेच इतर खाजगी वाहिन्यावर नेहमीच कार्यक्रम होत असतात. तरुणांसाठी त्यांनी ऑनलाइन यशाचा महामंत्र शिवतंत्र कोर्स ची निर्मिती केली आहे. शेकडो तरुण याचा फायदा घेत आहेत. छत्रपतींच्या चरित्रातून आजच्या तरुणांनी यशस्वी कसे व्हायचे हे या कोर्समध्ये शिकवले जाते. त्यांच्या वेबसाईट मुळे जगभरातील मराठी माणसांपर्यंत ही माहिती पोहोचली आहे. यापूर्वी शिवशाहीर विजय तनपुरे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल दिल्ली विद्यापीठाने तीन वर्षांपूर्वी त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मान केला आहे. आपले गेले काय त्यापेक्षा आपल्याकडे काय शिल्लक आहे याचा विचार केला तर जीवनामध्ये यश निश्चितच मिळते असा मूलमंत्र ते तरुणांना सातत्याने देत असतात. राजमाता जिजाऊ उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवशाहीर विजय तनपुरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा