Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ मार्च, २०२२

अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा निमित्ताने शालेय पॅडचे वाटप



सोलापूर प्रतिनिधी : अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ई उपविभाग सोलापूर चंद्रकांत दिघे यांच्या ५४ व्या वाढदिवसा निमित्ताने दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा निमित्त ५४ विद्यार्थ्यांना
शालेय साहित्य पॅडचे वाटप करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत दिघे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम साजरा करण्यात आला ते सत्कारमूर्ती चंद्रकांत दिघे यांनी संस्थेचे कार्यक्रम हे अभिनव व समाजपयोगी असतात असे मत व्यक्त केले.

मातोश्री जिजामाता प्रशालेचे मुख्याध्यापक दिपक जळकोटे यांनी विद्यार्थ्यांनासाठी अतिशय उपयुक्त असा सामाजिक उपक्रम आहे असे मत व्यक्त केले. 

सत्कारमुर्ती चंद्रकांत दिघे,संस्थेचे अध्यक्ष मयुर गवते मुख्याध्यापक दिपक जळकोटे, सहशिक्षिका सुनंदा देसाई, सहशिक्षिका वंदना आगवणे,सहशिक्षक रशीद तांबोळी, सहशिक्षक रविंद्र वाडीकर,सहशिक्षक विनोद महाजन आदींची उपस्थिती होती.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयुर गवते यांनी स्व:ताचे अनुभव कथन केले की आम्हाला दहावीच्या परीक्षेवेळी पॅड नसल्याने पेपर लिहण्यास अडचणी येत होत्या त्या गोष्टी लक्षात ठेवूनच पॅडचे वाटप करण्यात आले असे मत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास शरणु स्वामी, आनंद फुलारी, कल्लप्पा सासवे व संस्थेचे सदस्य व शिक्षक वर्ग उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध