Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ९ मार्च, २०२२



एसटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे एसटी कामगारांना विलिनीकरण सदृश्य लाभ देण्याचं राज्य सरकारमध्ये घटत आहे.याबाबत आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महत्त्वाची बैठक झाली.या बैठकीत कामगारांच्या एकूण 18 मागण्यांवर चर्चा झाली त्यातील 16 मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. 

तसेच कामगारांना विलिनीकरण सदृश्य लाभ देण्यास सरकार सहमत आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.त्यानंतर अनिल परब उद्या याबाबतची घोषणा विधानसभेत करणार आहेत,अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.शिवाय गेल्या दीडएक महिन्यापासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संपही उद्याच मिटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध