Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ९ मार्च, २०२२

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ वा वर्धापन दिवसानिमित्त अनाथ मतिमंद मुलांना दूध वाटप






शिरपूर प्रतिनिधी:आज ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ वा वर्धापन दिवसानिमित्त शिरपूर येथील कै.बापूसाहेब एन झेड मराठे संचलित शिरपूर येथील मतिमंद मुलांच्या बालगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर तालुका व शिरपूर शहर यांच्या वतीने या अनाथ मतिमंद मुलांना दूध वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमास उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी,मनसे तालुकाध्यक्ष पुनमचंद मोरे,मनसे शहराध्यक्ष चेतन राजपूत, तालुका उपाध्यक्ष राकेश गुजर, गट अध्यक्ष अमोल गुजर, शिरपूर शहर उपाध्यक्ष अतुल बडगुजर,शिरपूर शहर उपाध्यक्ष मैहमूद तेली, नरेश तिरमले,गट अध्यक्ष विकी मोरे, विभाग अध्यक्ष आकाश भोई, गणेश मोरे, गौरव बारी, इत्यादी हजर होते.


बालवीर आचे अधीक्षक व इतर कर्मचारी वर्ग यांनी महाराष्ट्र निर्माण सेनेकडून वेळोवेळी अनाथ मुलांना दिले जाणारे अन्नदान याबाबत कौतुकाचे दोन शब्द सांगितले. तरी आपले असेच काम स्वरूपी सहकार्य करावे अशी इच्छा व्यक्त केली तरी यावेळी मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध