Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० मार्च, २०२२

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यासह काटवान,पश्चिम पट्ट्यात जोरदार पावसासह गारपिटीने शेतकर्यांचे मोठे नुकसान व नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे अशी प.स.सदस्य यांची मागणी- सौ अर्चना देसले,(माऊली)



साक्री तालुक्यातील काटवान भागातील बेहेड,म्हसदी,वसमार,देऊर,सह शिवारात तसेच परिसरातील गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली.या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे पंचनामे कृषी विभागासह महसुल विभाग तसेच पंचायत समिती सदस्य सौ.अर्चना राजधर देसले यांचे प्रतिनिधी श्री.राजधर देसले मा.पंचायत समिती सदस्य यांनी कालपासून सुरु केले आहेत. वसमार शिवारात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.यावेळी गारपीटमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला. तसेच गारपीट व वादळी वाऱ्यामुळे कांदा,गहू,
मका,हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परिसरात आंब्याला आलेला मोहर गळून पडलेले आहेत.तसेच उभी पीक जमिनदोस्त झाली आहेत.काल या पिकांची कृषी विभाग तसेच महसुल विभागाच्या वतीने पाहणी करण्यात आली होती.त्यानंतर महसुल विभागाच्या वतीने तहसीलदार प्रविण चव्हाणके यांच्या आदेशानुसार वसमार पुनर्वसन गावठाण शेत शिवारामध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यास सुरुवात झाली आहे. 

वसमार येथील तलाठी रोहीत झोडगे,कृषी सहाय्यक विकास अहिरराव व मा.पंचायत समिती सदस्य श्री.राजधर देसले यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनाम्याला सुरुवात केली.वसमार परिसरात शेतकर्‍यांच्या २०० ते २५० हेक्टर क्षेत्र पिकांची ७० ते ७५ टक्के पाहणी करून पंचनामा काल करण्यात आला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सी.के.ठाकरे,साक्री कृषी सहाय्यक सुरेंद्रनाथ शिंदे,कृषी सहाय्यक अविनाश कुवर, साक्री पंचायत समिती सदस्य म्हसदी गण यांचे प्रतिनिधी मा.पं.स.सदस्य राजधर देसले उपस्थित होते.तसेच परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी यावेळी उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध