Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ मार्च, २०२२

शिरपूर तालुक्यातील उपरपिंड शिवारात तापी नदी पात्रात वाळूची चोरटी वाहतूक



शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर तालुक्यातील उपरपिंड शिवारात तापी नदी पात्रात वाळूची चोरटी वाहतूक महसूल अधिकाऱ्याने पकडली असता चालकाने वाळूसह ट्रॅक्टर पळवून नेल्याने चालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,दि.१० मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उपरपिंड गावाजवळील तापी नदी पात्रात वाळू चोरी होत असल्याची खबर मिळाली. महसूल विभागातील विलास बाबूलाल नागलोद हे लागलीच त्या ठिकाणी पोहोचले,यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये सुमारे १ ब्रास रेती आढळून आली.त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने वाळूसह ट्रॅक्टर पळवून नेले.याप्रकरणी विलास नागलोद यांनी काल पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञाताने दोन लाख रुपये किंमतीच्या ट्रॅक्टरसह २७ हजार ४०० रुपये किंमतीची वाळू असा एकूण २ लाख २७ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे म्हटले आहे.या फिर्यादीची दखल घेत पोलिसांनी ट्रॅक्टर चालकासह मालक अमृत आनंदा पाटील,रा.उपरपिंड यांच्यावर गुन्हा दाखल 
करण्यात आला आहे. हे.कॉ.साठे करीत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध