Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्याचा अर्थ संकल्पात अंगणवाडी कर्मचार्यांचा पदरी निराशाच कुठल्याही ठोस अंमलबजावणी नाही
राज्याचा अर्थ संकल्पात अंगणवाडी कर्मचार्यांचा पदरी निराशाच कुठल्याही ठोस अंमलबजावणी नाही
गेल्या काही महिन्यांपासून आपण आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलनात उतरलो आहोत.मानधनात वाढ,मासिक पेन्शन,नवीन मोबाईल, दैनंदिन माहिती भरण्यासाठी मराठीमधील चांगले ॲप,लाभार्थ्यांना चांगला पूरक पोषण आहार,अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ,किरकोळ खर्चासाठीच्या रकमेत वाढ, रिक्त जागांवर भरती, पदोन्नती आदी मागण्यांसाठी आपण सर्व जिल्ह्यांमध्ये अनेकदा आंदोलने केली. २३ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती कुंदन यांनी शिष्टमंडळाला भेट दिली व अनेक आश्वासने दिली. आपले तीन दिवसांचे आंदोलन आपण त्यांच्या आश्वासनामुळे पहिल्याच दिवशी मागे घेतले.राज्य सरकारच्या बजेटमध्ये काही मागण्या पदरात पडतील अशी अपेक्षा होती.
त्यामुळे आपण बजेट जाहीर होईपर्यंत जिल्हा पातळीवर आंदोलन सुरू ठेवण्याचा व बजेटमध्ये काही ठोस पदरात न पडल्यास १५ मार्च रोजी पुन्हा एकदा आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.आज बजेट जाहीर झाले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल देण्याची घोषणा वगळता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. मानधन वाढीची काही वाहिन्यांनी दिलेली बातमी खोटी व गैरसमज पसरवणारी होती.
त्यामुळे आपल्या पदरात अजूनच निराशा पडली.त्या निराशेचे संतापात रुपांतर झाले.त्यातूनच कृती समितीच्या बाहेरच्या काही अपरिपक्व संघटनांनी खातरजमा न करता श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
कृती समितीने या सर्व पार्श्वभूमीवर ताबडतोब ऑनलाईन बैठक घेऊन १५ मार्च रोजी आझाद मैदानावर संताप मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला भगिनींनो,केंद्र सरकारच्या बजेटने तर आपल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेच होते.आता राज्य सरकारने देखील त्याचीच पुनरावृत्ती केली. आता आपला संताप व्यक्त करण्याची वेळ आली आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा