Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
उत्तरप्रदेश मधील विधानसभा निवडडणूक भाजपच्या विजयासाठी मायावतींची छुपी मदती मुळे भाजपचा विजय सुखर झाला
उत्तरप्रदेश मधील विधानसभा निवडडणूक भाजपच्या विजयासाठी मायावतींची छुपी मदती मुळे भाजपचा विजय सुखर झाला
उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत ४०३ पैकी २७३ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. तरीही २०१७ च्या विधानसभेच्या तुलनेत भाजपने ५२ जागा गमावलेल्या आहेत. हा विजय भाजपसाठी इतका सोपा नव्हता. त्यामुळे भाजपनेही जातपात व दबावतंत्राचे राजकारण खेळले. आपल्या एके काळच्या शत्रू पक्ष म्हणजेच बहुजन समाज पार्टीशी छुपी युती करून समाजवादी पक्षाची मुस्लिम मते फोडली व सत्तास्थापनेकडे वाटचाल केली.
उत्तर प्रदेशातील एकेकाळच्या बलाढ्य नेत्या मायावती यांनी त्यांच्या कारकिर्दीत अफाट बेहिशोबी कोट्यवधी रुपयांची माया जमवली. त्यामुळे त्यांना इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचे भय भाजपने दाखवले व त्यांना अंकित केले.
▪︎ यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत मायावती यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पार्टीने भाजपशी छुपी युती केली. व तेथेच समाजवादी पक्षाच्या घोड्याला वेसण घालण्याची रणनीती आखली.
▪︎ उत्तरप्रदेशात जातीचे राजकारण मोठे आहे. उत्तरप्रदेशात ४ कोटी म्हणजेच २० टक्के मुस्लिम मतदार आहेत. यापैकी १४३ जागांवर मुस्लिम हक्क सांगतात. तर १०७ जागांवर मुस्लिम मतदार डिसिजनमेकर आहेत. या सर्व जागांवर समाजवादी पक्षाचे प्राबल्य होते. या गडांना सुरुंग लावण्यासाठी भाजपने मायावतींची मदत घेतली.
▪︎ भाजपने या राज्यात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. बसपाने ८८ तर समाजवादी पक्षाने ६१ मुस्लिम उमेदवार उभे केले. त्यामुळे साहाजिकच मुस्लिम मतांचे विभाजन झाले. समाजवादी पक्षाची हक्काची मते गेली व भाजपाला विजय मिळवणे सोपे झाले.
▪︎ समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ले समजले जाणाऱ्या व मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असणाऱ्या विशेष २८ जागांवर बसपानेही मातब्बर मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्यांना भाजपकडून आर्थिक रसदही पुरवली गेली.सहाजिकच तिथे समाजवादी पक्षाचे उमेदवार पराभूत झाले.
▪︎ भाजपचे मातब्बर उमेदवार जिथे उभे होते, तिथे मायावतींनी कच्चे उमेदवार दिले व त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. विशेष म्हणजे या निवडणुकीत एमआयएम हा पक्षही उरलेला होता. त्यांचीही भाजपशी देशात छुपी युती आहे. अर्थात त्यांची उत्तरप्रदेशमधील ताकद नगण्य आहे. त्यांनी यंदा १०३ जागा लढवल्या. त्यांना फारशी मते पडली नाहीत पण समाजवादी पक्षासाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करण्याचे व सपाच्या उमेदवारांची मते खाण्याचे काम त्यानी केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा