Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ मार्च, २०२२

पिंपळनेर पोलिसांनी रोखली गुटख्याची तस्करी कारसह ३९ लाखांचा गुटखा जप्त, धुळ्याचे दोघे ताब्यात, चार जण फरार



   गुजरात (gujrat) राज्यातून होणारी (Gutka) गुटख्याची तस्करी पिंपळनेर पोलिसांनी (Pimpalner Police) रोखली. पीकअप आणि कारसह ३९ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी धुळ्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून चार जण फरार आहेत. काल रात्री ही कारवाई करण्यात आली.
नवापूर-साक्री (Navapur-Sakri) मार्गे अवैधरित्या प्रतिबंधीत गुटख्याची वाहतुक होणारी असल्याची गुप्त माहिती पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळूखें यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्यासह पथकाने सामोडे चौफुलीवर सापळा रचला.
रात्री नऊ वाजेच्या सुमारास पीकअप वाहनाला थांबविले.चालकाची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव नसीर खान हयात खान (वय ४२ रा.मिल्लत नगर, चाळीसगाव रोड धुळे) असे सांगितले.
पीकअपमधील मालाबाबत विचारपूस केली असता विमल सुगंधीत पान मसाला असल्याचे सांगितले. धुळ्यातील नाना विठ्ठल साबळे व अमोल मोरे या दोघांच्या सांगण्यावरुन तसेच जुबेर अन्सारी, वसीम अन्सारी, सोनु विधाते तिघे (रा.नटराज टॉकीज जवळ, धुळे), सचिन मुर्दाडकर (रा.पाचवी गल्ली, प्रियकिर्ती पगारे रा.गायकवाड चौक) यांच्यासोबत गुजरात राज्यातून विकत घेवून धुळ्याला जात असल्याचे सांगितले.
वरील ५ जणे एम.एच.०६ बी.ई.७६९५ क्रमांकाची कारमध्ये बसून पोलिस वाहनावर पाळत ठेवून माल नेत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सपोनि साळूंखे आणि त्यांच्या पथकाने मागुन येणार्‍या कारला थांबण्याचा इशारा दिला. कार थांबली नाही.त्यामुळे पाठलाग केला.

पोलिसांना पाहुन तीन जण पळून गेले. प्रियकिर्ती पगारे हा पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी आठ लाखांचे पीकअप वाहन ,१० लाख ७४ हजार रुपयांचा विमल पानमसाला, ६ लाख २ हजार १०० रुपये किंमतीचा जुबा केसरी पान मसाला,१ लाख ८९ हजार ५४० रुपये किंमतीचा व्ही-१ तंबाकू तसेच आणखी एका गोणीमध्ये ७५ हजार रुपये किंमतीचा व्ही-१ तंबाकू मसाला आणि १२ लाख रुपये किंमतीची इनोव्हा कार असा ३९ लाख ४० हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भादंवि ३२८,२७२, २७३,१८८ सह अन्न सुरक्षा व मानवी कायदा अन्वये आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई (Superintendent of Police Pravin Kumar Patil) पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav), उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, एलसीबी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन साळूंखे, उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, भाईदास मालचे, एएसआय प्रविण अमृतकर पोना विशाल मोहणे, चेतन सोनवणे, सोमनाथ पाटील, मकरंद पाटील, रविंद्र सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध