Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ मार्च, २०२२

धुळे जिल्ह्यातील भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण योजना



धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यातील भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित दारिद्र्यरेषेखालील जमातीच्या भूमिहीन कुटुंबांना चार एकर जिरायती  कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती  ओलिताखालील शेती देण्यात येणार आहे.

ही योजना आदिवासी विकास विभागातर्फे १०० टक्के अनुदानित आहे.या योजनेसाठी २८ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत अर्ज घेऊन ते १५ मार्च पर्यंत सादर करावेत,असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून करण्यात आले आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखाली भूमिहीन आदिवासी बांधवांनी अर्ज करावेत असे प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध