Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ मार्च, २०२२

महाविकासघाडी विरोधात जाणार २५ आमदार ?




शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत राज्यात महा विकास आघाडी सरकार स्थापन केलं खरं.मात्र या सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा वाद झाल्याचं पाहायला मिळतो.अशातच आता शिवसेनेच्या पंचवीस आमदारांनी निधीबाबत त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आता दंड थोपटले आहेत.

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्ताव अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी देण्यात आले त्यात काँग्रेस आमदारांच्या मतदार संघासाठी ९०० कोटी रुपये, राष्ट्रवादी आमदारांच्या मतदार संघासाठी ७०० कोटी, शिवसेना आमदारांचे मतदार संघासाठी केवळ ३०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले. काही मंत्री त्यांच्या आमदारांना बोलून निधी देतात आणि आम्ही गेल्यावर राज्याच्या आर्थिक परिस्थितीचे कारण देतात. अशी तक्रार शिवसेनेचे आमदार करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध