Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ मार्च, २०२२

OBC आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर



ओबीसी आरक्षण विधेयक OBC Reservation Bill आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात मांडण्यात आले.त्यानंतर सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.आता निवडणूक वगळता सर्व अधिकार राज्यसरकारने स्वतःकडे घेतले आहे.

OBC आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर झालं आहे. प्रभाग रचना, निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार आता राज्य सरकारकडे असणार आहे.मध्यप्रदेश पॅटर्न प्रमाणे राज्यात ओबीसी आरक्षणाचं विधेयक आणलं गेलं होतं,जे आज मंजूर करण्यात आलं आहे.त्यामुळे प्रभाग रचना, निवडणुकीच्या तारखा हे ठरवण्याचे अधिकार सरकारडे आलेले आहेत.हे विधेयक मंजूर झाल्याने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा OBC Reservation Bill जो प्रश्न प्रलंबित आहे,त्या प्रकरणता सर्वोच्च न्यायालयने ट्रिपल टेस्ट करण्यास सांगितलेलं आहे. आता ट्रिपल टेस्ट करणयासाठी राज्य सरकारला काही कालावधी मिळणार आहे.

हे विधेयक मंजूर झाल्यामुळे प्रभाग रचना, वॉर्ड रचना,मतदार याद्या बनवणे, निवडणूक कार्यक्रम इत्यादी संदर्भातील सर्व अधिकार राज्य सरकारडे येणार आहेत. आजच भरा गाडीत पेट्रोल-डिझेल...नाहीतर यामुळे मुंबई, ठाणे, पुणे इत्यादींसह ज्या महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत, त्या निवडणुका किमान चार-पाच महिन्यांपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात. कारण, प्रभाग रचनेचे अधिकार आता राज्य सरकारडे आलेले आहेत. परंतु अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाच्या स्वाक्षरीनेच होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध