Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ मार्च, २०२२

साक्री तहसील कार्यालया समोर अनिल गोटे व ॲड चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन




धुळे प्रतिनिधी:भाजपाचे नेते माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,माजी मंत्री गिरिषभाऊ महाजन,माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार,
प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल,माजी मंत्री जयकुमारभाऊ रावल व प्रदेश भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यात गोवुन मोक्का सारख्या गंभीर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी व खोटा एफआयआर तयार करुन यंत्रणेला साह्य करण्याचा जो प्रयत्न महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे व विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत महाविकास आघाडी च्या उद्धव ठाकरे सरकारच्या पाठिंब्याने राज्यात सुरू होता.त्यांचे विधानसभेत हे संपुर्ण षडयंत्र पुराव्यासहित उघडकीस आणण्याचे काम राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 125 तासांच्या स्टिंग ऑपरेशनने कालविधान सभेत सादर केले आहे.

हे षडयंत्र रचण्यात प्रमुख भुमिका निभावणाऱ्या माजी आमदार अनिल गोटे व विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचे आंदोलन साक्री तहसील कार्यालया समोर व भाजपा कार्यालया जवळ करण्यात आले.

या वेळी आंदोलनात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटिल,पिंपळनेर मंडलाध्यक्ष इंजी.मोहन सुर्यवंशी,साक्री मंडलाध्यक्ष वेडू सोनवणे,उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते,विलास मोरे,शहर अध्यक्ष कल्याण भोसले,उपाध्यक्ष मा. विनोदकुमार पगारिया,माजी तालुकाध्यक्ष संजय आहिरराव,मंडळ उपाध्यक्ष राकेश दहिते,योगेश भामरे,अल्पसंख्यक आघाडीचे अध्यक्ष बाबा पठाण,रंगनाथ भवरे,शिवाजी देवरे,स्वप्निल भावसार , दीपक कोठवदे ,नगर सेवक दीपक वाघ , विनोद पाटिल,शहर युवा मोर्चा चे कार्तिक रामोले ,सुरेश शेवाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध