Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ मार्च, २०२२

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा,साक्री,शिरपूरात भाजपा तर्फे माजी मुख्यमंत्री तथा विधान सभा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांना मिळालेली नोटिशीची केली होळी



धुळे : राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधान सभा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांना १६० अंतर्गत नोटीस पाठवली आहे. बदल्यांमध्ये वसुली सुरू असल्याचा अहवाल ६ महिने सरकार दरबारी पडून असताना त्यावर आघाडी सरकारने काही ही कारवाई केली नाही पण ते वसुली रॅकेट उघडकीस आणणार्‍या विरोधी पक्षनेत्याला मात्र नोटीस बजावल्याबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा नेतुत्वा खाली विजयस्तंभा चौकात दि.१३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा कडुन ना. देवेंद्रजी फडणवीस यांना मिळालेली नोटिशीची होळी करून निषेध करत महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार करण्यात आला. याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, व्यापारी आघाडी माजी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, नगर सेवक भुरा राजपुत, हर्षल राजपुत, माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, मुबीन शेख, रफीक तेली, रविंद्र भोई, अविनाश शिंपी, अरविंद्र जाधव, अमोल पाटील, अतुल पाटील, रविंद्र राजपुत, बापु पाटील, संतोष माळी, जितेंद्र पाटील हिंगोणी, अजिंक्य शिरसाठ, श्रीकृष्ण शर्मा, विनायक कोळी, राज सिसोदिया, दिपक धनगर, विशाल धनगर, बंटी माळी, गणेश माळी, प्रमोद पाटील, प्रमोद मराठे, चेतन मराठे, रोहित भोई, कृष्णा मराठे, केतन पंडीत, खुशाल पाटील, विपुल कलाल, हर्षल भोई, आनंदा पाटील, दत्तु (बाॅम्बे टेलर) शिंपी, बंटी भोई, आप्पा धनगर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध