Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ११ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
उत्कृष्ट पत्रकार म्हणून दिपक वाघ यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र सिने कला गौरव पुरस्कार प्रदान..!
उत्कृष्ट पत्रकार म्हणून दिपक वाघ यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र सिने कला गौरव पुरस्कार प्रदान..!
धुळे - एन फिल्म प्रोडक्शन व सा.आपले ज्ञानपंख यांच्या वतीने औरंगाबाद येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार सोहळा शानदार रितीने संपन्न झाला आहे.मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे आपल्या कला गुणांनी सपन्न अशा राज्यातील महत्वकांशी व्यक्तींना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. पत्रकारिता क्षेत्रात जनहितार्थ उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल धुळे जिल्ह्यातील पत्रकार दिपक वाघ यांना सन्मानचिन्ह देऊन उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरविण्यात आले आहे.त्यामुळे धुळे जिल्ह्यातून सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे..
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झेपचे मुख्यसंपादक डी . एन . जाधव , हे होते , तर उद्घाटन सिने अभिनेत्री सुलक्षणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
या कार्यक्रमाचे आयोजन लोकशाही मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा सा. आपले ज्ञानपंखचे संपादक दशरथ सुरडकर , एन फिल्म प्रोडक्शन दिग्दर्शक दिपक म्हस्के यांनी केले होते...
याप्रसंगी एक्सप्रेस न्यूजचे संपादक अकाश ठाकुर , प्रदेश उपाध्यक्ष किशोर भालेराव , प्रदेश सचिव गौतम शिंदे ,सिने अभिनेत्री पालवी फिल्मच्या किरण बनकर ,सिने अभिनेत्री अश्विनी सोनार,बाबुराव जुंबडे धाडकर,सिने अभिनेता सुहास वैद्य , टि .व्ही .सिरीयल अभिनेता राजेश कांबळे, टि.व्ही.सिरीयल अभिनेता गणेश मोरे , पत्रकार प्रवीण तायडे, गोकुळ सिंग राजपूत, विजय खरात,सचिन जगताप, आदींची प्रमुख उपस्थिती होती.. या कार्यक्रमाला मुंबई,पुणे, सोलापूर कोल्हापूर सातारा,सांगली औरंगाबाद,संगमनेर,उस्मानाबाद, जळगाव, धुळे आधी मोठ्या शहरातील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
धुळे जिल्ह्यातील पत्रकार दीपक वाघ सर्वसामान्य कुटुंबातले असून त्यांना नागरी समस्यांची जाण आहे त्यांनी या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक वंचित गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे..
आदिवासींच्या समस्या,विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, भ्रष्टाचार असो किंवा सामान्य जनतेची हाक, समाजातील एखादी सकारात्मक बाब,याबाबत नुसती बातमी न देता, त्या बातमीच्या मुळाशी जाऊन व पाठपुरावा करुन विषयाला न्याय देण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न सुरु आहे. त्यांच पार्श्वभूमीवर त्यांची उत्कृष्ट पत्रकारिता या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती नुकताच त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र सिने कला गौरव पुरस्कार देऊन औरंगाबाद जिल्ह्यात सन्मानित करण्यात आल आहे.
त्याना पुरस्कार मिळाल्याबद्दल धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष टीव्ही 9 चे जिल्हा प्रतिनिधी विशाल ठाकूर, दै. खान्देश वृत्तपत्राचे मुख्य संपादक मनोज गर्दे, जेष्ठ पत्रकार यशवंत हारणे, स्वाभिमानी न्यूज चैनलचे संचालक प्रकाश शिरसाठ, लोकजनशक्ती पार्टी चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे, महिला अध्यक्षा शोभाताई चव्हाण, आवाज टिव्ही चैनलचे मुख्य संचालक जेष्ठ कैलास गर्दे व दै. स्वतंत्र भारताचे पंकज पाटील, पत्रकार गोकुळ सिंग राजपूत, प्रवीण तायडे, पत्रकार रवींद्र कढरे,रवी नगराळे पवन मराठे,सुनील निकम, पत्रकार रवी शिंदे, मनोज चौधरी दै केशरीचे आकाश सोनवणे संदीप त्रिभुवन,रोशन खैरनार, प्रवीण मोरे आधी पत्रकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा