Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

आपल्या स्वतःचाच सेवानिवृत्तीच्या दिवशी लाच घेताना शिरपूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना अटक...



धुळे मधील शिरपूर तालुक्यातील बी डी ओ यांनी सेवानिवृत्तीच्या दोन तास आधीच गटविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.गटविकास अधिकारींसह सहाय्यक लेखा अधिकारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय डी.शिंदे हे आज दि. ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते.याबाबत दि.१ एप्रिल रोजी0 सेवानिवृत्तीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.
सेवानिवृत्त कार्यक्रमाचे पत्रीका देखील वाटप झाल्या होत्या.मात्र आज दि ३१ रोजी सेवानिवृत्तीच्या दोन तास आधीच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिताफीने ताब्यात घेतले आहे.गटविकास अधिकारी वाय.डी. शिंदे यांच्या सांगण्यावरून सहाय्यक लेखा अधिकारी चुनीलाल देवरे या कर्मचारीला पाच हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

अर्जदार हे जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षक असून,त्यांच्या तक्रारीवरुन आज लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे.तक्रारदार यांची पी.एफ.कर्जाची फाईल पुढे पाठविण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे विभागाने शिरपूर पंचायत समितीच्या आवारात सापळा रचून कारवाई केली आहे.दुपारी उशीरापर्यंत कारवाई सुरू आहे.




1 टिप्पणी:

  1. राजकीय व्यक्ती ना प्रसिध्दी साठी घाई असते निवृत्ती नंतर एक दोन दिवस तरी थांबले असते कारण अधिकारी भ्रष्ट आहे की नाही ते कळले असते किंवा अधिकाऱ्याला वाचविता आले असते प्रामाणिक असते तर फुकटची पब्लिसिटी कधी कधी तोट्याची असते

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध