Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

आतापर्यंत ४ ९ रिक्षा कालबाह्य झालेल्या आढळून आल्या होत्या त्या जप्त करून बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात तोडण्यात आल्या धुळे शहरात सोमवारपासून आरटीओ व पोलिसांकडून ही कारवाई केली जाणार



धुळे शहरात १८ वर्ष जुन्या असूनही रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांची शोध मोहीम प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सुरु आहे. तीन दिवसात एकूण ४ ९ रिक्षा पकडून त्या तोडल्या गेल्या आहेत जिल्ह्यात अशा एकूण २०० रिक्षा रस्त्यावर धावत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल कदम यांनी दिली.धुळे शहरात सोमवारपासून आरटीओ व पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे.

या कारवाईत आतापर्यंत ४ ९ रिक्षा कालबाह्य झालेल्या आढळून आल्या होत्या त्या जप्त करून बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात तोडण्यात आल्या आहेत जिल्हाभरात दोनशे कालबाह्य रिक्षा आहेत.तर दोनशे रिक्षांचा परवाना आहे ; मात्र त्या कालबाह्य झालेल्या आहेत.अशा रिक्षांचा परवाना नूतनीकरण,वाहन तपासणी,वाहन नोंदणी,वाहन हस्तांतरण आदीची पूर्तता रिक्षा चालकांनी करणे आवश्यक असताना चालकांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

त्यामुळे अनेक वर्षापासून कालबाह्य रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात होती.ही वाहतूक थांबावी व कालबाह्य रिक्षांचा शोध लागावा,यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने शहरासह शिंदखेडा , शिरपूर,साक्री व धुळे ग्रामीणमधील पोलिसांच्या मदतीने कालबाह्य रिक्षांचा शोध घेण्यासाठी पथक नियुक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध