Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ मार्च, २०२२

ना.देवेंद्र फडणवीस यांना मिळालेली नोटिशीची शिरपूर भाजपा तर्फे होळी नोटिस म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार : प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी



शिरपूर : राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधान सभा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांना १६० अंतर्गत नोटीस पाठवली आहे. बदल्यांमध्ये वसुली सुरू असल्याचा अहवाल ६ महिने सरकार दरबारी पडून असताना त्यावर आघाडी सरकारने काही ही कारवाई केली नाही पण ते वसुली रॅकेट उघडकीस आणणार्‍या विरोधी पक्षनेत्याला मात्र नोटीस बजावल्याबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थित येथील विजयस्तंभा चौकात दि.१३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा कडुन ना.देवेंद्र फडणवीस यांना मिळालेली नोटिशीची होळी करून निषेध करत महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार करण्यात आला. 


याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील,व्यापारी आघाडी माजी जिल्हाध्यक्ष एन.डी. पाटील, नगर सेवक भुरा राजपुत, हर्षल राजपुत,माजी जिल्हा चिटणीस संजय आसापुरे,तालुका चिटणीस सुनिल चौधरी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील,रोहित शेटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, मुबीन शेख,रफीक तेली,रविंद्र भोई, अविनाश शिंपी,अरविंद्र जाधव,अमोल पाटील,अतुल पाटील, रविंद्र राजपुत, बापु पाटील, संतोष माळी,जितेंद्र पाटील हिंगोणी,अजिंक्य शिरसाठ,श्रीकृष्ण शर्मा, विनायक कोळी,राज सिसोदिया, दिपक धनगर,विशाल धनगर,बंटी माळी,गणेश माळी, प्रमोद पाटील,प्रमोद मराठे,चेतन मराठे, रोहित भोई, कृष्णा मराठे, केतन पंडीत,खुशाल पाटील,विपुल कलाल, हर्षल भोई,आनंदा पाटील, दत्तु (बाॅम्बे टेलर) शिंपी, बंटी भोई,आप्पा धनगर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले की, राज्य सरकारचे विरोधी पक्षातील नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र उघड पडल्याने बिथरलेल्या आघाडी सरकारने 'बदल्यांमधील वसुली रॅकेट उघडकीस आणणार्‍या विरोधी पक्षनेत्याला मात्र नोटीस बजावली आहे. हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असुन बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर त्याची तपशीलवार माहिती असलेला पेन ड्राईव्ह ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी केंद्रीय गृहसचिवांकडे तपासासाठी सादर केला होता. 

न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. अशा रितीने ना. देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून हा तपास रोखता येणार नाही.यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता असुन आघाडी सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत.एका मागोमाग एक मंत्री तुरुंगात जात आहेत.त्यांचा पापाचा घडा भरत आहे.

यामुळे आघाडीचे नेते घाबरून गेले आहेत. 
परिणामी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना अडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडीची वाटचाल विनाशाकडे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध