Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

साक्री यशस्विनी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह साक्री नवीन व्हि.जुने येथिल 150 मुलींची आरोग्य तपासणी राष्ट्रवादी चा महिला धुळे जिल्हा अध्यक्ष ज्योती पावरा यांचा यशस्वीनी सामाजिक संस्थे मार्फत उपक्रम



धुळे:- साक्री तालुक्यातील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात 150 आदिवासी मुली या वेगवेगळे आदिवासी वस्ती,पाडे, लहान लहान खेडेपड्यातून चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी वसतिगृहात राहू आपले उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत राहतात त्यांना चांगल्या शिक्षणा बरोबरच त्यांचे चांगले आरोग्य रहावे यासाठी नेहमी वेगवेगळ्या पध्दतीने सरकारही प्रयत्नशील असतेच परंतू काही सामाजिक संघटनेत काम करणारे कार्यकरते व राजकीय नेते मंडळीही नेहमी आदिवासी मुला,मुलींचे वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे आयोजित करून त्यांना चांगले शिक्षण व आरोग्य मिळावे यासाठी प्रयत्नशील असतात..
मुली हे सहसा आपले आजार उघडपणे मांडत नाहीत त्यातही आदिवासी व अतिदुर्गम भागातल्या मुली हे नेहमी अर्धवट,अपूर्ण माहिती देत ,बोलायला घाबरत असतात व आपल्या आजारांची पूर्ण व व्यवस्थित माहित देत नसल्याने बऱ्याचदा मोठ्या आजाराचा सामना त्यांना करावा लागतो..त्यातही सिकलसेल हा आम्हा आदिवासींना होणार गंभीर आजार त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते व कुठलाही आजार हा लवकर होतो म्हणून यशस्विनी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून आज धुळे तालुक्यात साक्री येथे शासकीय आदिवासी मुलींची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य उपचार देण्यात आले व पुढील काही गंभीर आजार आढळल्यास त्यांना धुळे जिल्हा रुग्णालय येथे पाठविले जाईल.त्यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी धुळे जिल्हा रुग्णालयातील व साक्री तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी ,डॉक्टर्स यांचे सहकार्य राहील.
आज या आरोग्य शिबिरात रक्त तपासणी पासून मुलींची विविध चाचण्या व तपासणी करण्यात आले..साक्री येथिल आदिवासी वसतिगृहातील अधिक्षिका आर.आर.शिंदे मॅडम,डॉ.क्रांती वळवी मॅडम,डॉ.हिमानी खैरनार मॅडम,डॉ.लक्ष्मी बारेला डॉ.ललित भदाणे सर,फारमिस्ट रामदास पावरा,लॅब टेक्निशियन सुनिल शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले..
यशस्विनी सामाजिक अभियानाच्या धुळे जिल्हा शहर समन्वयक डॉ.सुवर्णा शिंदे, धुळे जिल्हा ग्रामीण समन्वयक ज्योती पावरा, समन्वयक डॉ.लक्ष्मी बारेला , अधिक्षिका श्रीमती आर.आर.शिंदे मॅडम, डॉ.क्रांती वळवी मॅडम,डॉ.हिमानी खैरनार मॅडम डॉ.ललित पाटील ,जी.एच खवले,एस.एस.शिरसाठ,अशोक सोनवणे, माया वाघ उपस्थित होते..

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध