Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ३ एप्रिल, २०२२

वाघाडी आश्रम शाळेला सलग दुसऱ्यादा 'ISO 9001-2015' मानांकन प्राप्त"



शिरपूर प्रतिनिधी :शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील आर सी पटेल माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळेला दुसऱ्यांदा ISO 9001-2015' मानांकन मिळाले आहे. त्यामुळे विद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
        
'माझी शाळा माझा अभिमान' व ' माझी शाळा सुंदर शाळा 'हा ध्यास घेऊन शाळेत विविध उपक्रम राबविण्यात  येतात.शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासह आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात.आदिवासी विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांची स्पर्धापरीक्षांचीही तयारी केली जाते. शालेय अभ्यासक्रमाबरोबर शालेय परिसरही उत्तम राखण्याचा नेहमी संस्थेच्या वतीने प्रयत्न केला जात असतो. यातूनच या शाळेला हे मानांकन मिळाले आहे.


एक उपक्रशील शाळा म्हणून या शाळेने  नाव लौकिक मिळवला आहे.यासाठी  माध्यमिक मुख्याध्यापक के.जे.राजपूत, समन्वयक,एच.के कोळी,पी.पी.चव्हाण,
ए.जी.परदेशी आश्रमशाळेतील सर्वं  शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यासाठी मेहनत घेतात.यासाठी शाळेला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे , आर.सी.पटेल शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष  अमरिशभाई पटेल,संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल भाऊसो.संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,संस्थेची सीईओ  डॉ.उमेश शर्मा,प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर,सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभागाचे पी.के ठाकरे,विजय भडगावकर,बी.एआव्हाड,शिक्षण विस्तार अधिकारी एल.एन.मोरे,एस‌.टी.पाटील  यांचे मार्गदर्शन लाभले.आर.सी.पटेल संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल ‌ नेहमीच आदिवासी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. आदिवासी समाजातील मुलांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणे हेच त्यांचे ध्येय आहे." शिरपूर ६०"सारख्या पॅटर्नतून मुलांना जीईई,नीट सारखा अभ्यासक्रम  शिकवण्यात येतो.त्यातून आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मोफत उपलब्ध केली जात आहे.
डॉ. उमेश शर्मा,सीईओ आर.सी.पटेल संस्था

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध