Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
मोठे वाघोदा येथील कमलाकर माळी या युवकाने वाढदिवसादिनी स्वखर्चाने ग्रामस्थांना दिली अनोखी वाचनकट्टाची भेट माणुसकी समुहाच्या माध्यमातुन स्तुत्य उपक्रम
मोठे वाघोदा येथील कमलाकर माळी या युवकाने वाढदिवसादिनी स्वखर्चाने ग्रामस्थांना दिली अनोखी वाचनकट्टाची भेट माणुसकी समुहाच्या माध्यमातुन स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधि.रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील सतत सामाजीक कार्यात अग्रेसर असलेले पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते कमलाकर माळी हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन नवीन उपक्रम राबवत असतात पण या वर्षी त्यांनी ग्रामस्थांना एक अनोखी भेट दिली आहे.स्वखर्चाने त्यांनी बसस्थानक परीसरात वडाच्या झाडाखाली बैठकी ओट्यावर वाघोदेकर सार्वजनिक वाचन कट्टयाची सोय ग्रामस्थांना करुन दिली आहे ग्रामस्थांना व गावातील तरुण मुलांना वाचनाची सवय लागावी यासाठी त्यांनी स्वखर्चाने हा समाजपोयोगी उपक्रम राबवला आहे.
आतापर्यंत त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान मोफत मोतीबिंदू शिबीर व्याख्यान रक्तदान शिबीर असे विविध उपक्रम राबवले आहेत आणी यावर्षी माणुसकी समुहाच्या माध्यमातुन सार्वजानिक वाचन कट्ट्याची सोय करुन दिली आहे त्यात काही वाचनीय पुस्तके तसेच दररोज वर्षभर वृत्तपत्र टाकण्याचे काम कमलाकर माळी यांच्यातर्फे करण्यात येणार आहे गावात भरपूर ग्रामस्थांना वाचनाची सवय आहे पण काही ना काही अभावी प्रत्येक जण पेपर खरेदी करु शकत नाही व सर्व समाज एका ठिकाणी येईल यासाठी हा प्रयत्न कमलाकर माळी यांनी केला आहे अशा या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुका कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक परियोजने अंतर्गत भुईमूग शेंगा बियाणे शंभर टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले साक्री ता...
-
साक्री तालुका कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक परियोजने अंतर्गत भुईमूग शेंगा बियाणे शंभर टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले साक्री ता...
-
शिंदखेडा तालुक्यातील दहिवेल (ता. शिंदखेडा) येथे घडलेली एक घटना अपघात असल्याचे प्रथमदर्शनी भासवत असली, तरी नरडाणा पोलिसांनी तपासाचा धागा पकडत...
-
बेटिवद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात मागील दोन दिवसांपासून हलकासा रिमझिम पाऊस पडत होता.मात्र,आज शुक्रवार दि.२७ जून रोजी दुपा...
-
शिरपूर : शिरपूर पिपल्स को. ऑप. बँकेत १ कोटी ६६ लाख ५८ हजार ८५१ रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेचा कनिष्ठ अधिकारी यो...
-
मुंबई: महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधान...
-
मानवाच्या ज्याप्रमाणे अन्न,वस्त्र व निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत,त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा चौथी मूलभूत गरज बनलेली असल्याने शेवटी जो शिक...
-
बेटावद प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे मा.एकनाथ राव खडसे यांच्या मालकीच्या खडसे फार्म्स,जळगांव येथून आलेल्या उच्च प्रतीच्या 10...
-
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – औद्योगिक क्षेत्रातील दर्जेदार उत्पादन व ग्राहकविश्वासाच्या बळावर अल्पावधीत यशाची घोडदौड करणाऱ्या लु...
-
शिरपूर प्रतिनिधी - 26 जुन शिरपूर येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शिरपूर शहर पोलीस स्टेशन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा