Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १ एप्रिल, २०२२

शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात वाटेल त्या ठिकाणी सोयीच्या जागेवर अनेक वीट भट्टी चालकांनी महसूल खात्याचे आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम वीट भट्टी टाकून आपले वीट भट्टीचे व्यवसाय , कारखाने सुरू




शिंदखेडा प्रतिनिधी: शिंदखेडा व शिरपूर तहसील कार्यालयापासून काही अंतरावर तसेच नदी किनाऱ्याल्या लागून आणि तालुक्यात ठिकठिकाणी तसेच काही ठिकाणी रस्त्याला लागून,बागायती शेत जमिनीवर,एन.ऐ.केलेल्या रहिवास जागांवर,वाटेल त्या ठिकाणी सोयीच्या जागेवर अनेक वीट भट्टी चालकांनी महसूल खात्याचे आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम वीट भट्टी टाकून आपले वीट भट्टीचे व्यवसाय , कारखाने सुरू केले आहेत.

शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात काही वीट भट्टी चालकांनी महसूल खात्याच्या नियमानुसार वीटभट्ट्या सुरू केल्या आहेत.परंतु अनेक वीटभट्टी चालकांनी महसूल खात्याची तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रीतसर परवानगी न घेता सोयीनुसार वाटेल त्या ठिकाणी मर्जीनुसार वीटभट्टया कारखाने सुरू केले आहेत,या शेती मालकाने शेतीचा वापर भाडे तत्त्वाने व्यवसायिक दृष्ट्या केल्याने जागा मालकाकडून व्यवसाय कर का वसूल करू नये ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,

याच प्रमाणे तालुक्यात प्रमुख रस्त्यांच्या आजूबाजूला बागायती शेतजमिनीवर वीटभट्टया सुरू आहेत यामुळे पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम झाला असून महसूल व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी देताना ज्या अटी - शर्ती दिलेल्या आहेत त्याचे पालन केले जात आहे किंवा नाही याबाबत शिंदखेडा व शिरपूर तहसीलदार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मंडळ अधिकारी तलाठी यांच्या माध्यमातून वीट भट्याचे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन स्थळ पंचनामे करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी असी मागनी जनते कडून होतेआहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध