Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २० एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसाचे करणार पठण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसाचे करणार पठण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
शिरपूर प्रतिनिधी :- आज दि.२० रोजीमशिदींवरील भोंग्यांमधून उच्च स्वरात दिला जाणाऱ्या अजानसह विविध घोषणांमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत
आहे,याबाबत विविध न्यायालयांत दाखल जनहित याचिकांवर वेळोवेळी खंडपीठांनी भोंग्याविरोधात निकाल दिले आहेत, सर्वोच्च न्यायालयानेही १८ जुलै २००५ च्या जनहित याचिकेवरील निकालात मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे तत्काळ पालन करावे, याबाबत आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मशिदींसमोर दुप्पट आवाज हनुमान चालिसाचे पठण करण्यात येईल,याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील , असा इशारा आज मनसेने दिला,या मागणीबाबत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांची भेट घेत निवेदन दिले,
त्यात म्हटले आहे, की भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा आपल्या धर्माचे पालन करण्याचा समान अधिकार दिला आहे.तसेच आपल्या धर्माप्रमाणे आचार - प्रचार,उपासनेचाही अधिकार दिला आहे,मात्र,तसे करताना अन्य धर्मीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होणार नाहबी, याची काळजी घेण्याचे घटनेत अभिप्रेत आहे,भोंग्यांमधून अजानच्या घोषणा देणे हा इस्लामचा भाग नसून,अनेक मुस्लिम देशांत यावर कडक निर्बंध आहेत . १ ९ ७० च्या दशकापर्यंत मशिदींवरील भोंग्यांमधून अजाणच्या घोषणा देण्यात येत नव्हत्या,मशिदींवरील भोंग्यांमदून उच्च स्वरातील अजाण,घोषणांमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याबाबत विविध न्यायालयांत दाखल जनहित याचिकांवर खंडपीठांनी भोंग्यांविरोधात निकाल दिला आहे,
सर्वोच्च न्यायालयानेही १८ जुलै २००५ च्या जनहित याचिकेवरील निकाल देताना प्रत्येक भारतीयास घटनेच्या कलम २१ अन्वये दिलेल्या जगण्याच्या अधिकारात ध्वनिप्रदूषणामुळे व्यत्यय येत असून, मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे,मशिदींवरील भोंगे काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन होणे अपेक्षित असताना न होता मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर सीआरपीसी कलम १४ ९ अन्वये बजावण्यात आलेल्या नोटिसा या संविधानाने दिलेल्या जगण्याच्या अधिकाराचे व सर्वोच्च न्यायालयाच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील निकालाचे उल्लंघन आहे,
यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे,मशिदींवरील भोंगे आठ दिवसांच्या आत न उतरविल्यास मनसेतर्फे मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करण्यात येईल,यातून कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस प्रशासनाची राहील,असेही निवेदनात म्हटले आहे,
निवेदन देण्यासाठी मनसेचे जिल्हा संघटक धीरज देसले ,जिल्हाध्यक्ष दुष्यंत देशमुख , राकेश चौधरी ,महिला आघाडीच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी,सचिव अजितसिंह राजपूत,मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख,शिरपूर तालुकाध्यक्ष पूनमचंद मोरे, हर्शल परदेशी,अनिल शिरसाट,संजय सोनवणे ,संदीप बच्छाव,संदीप जडे, बबनराव पाटील ,गोपाल सोनवणे ,दिलीप शिरसाट ,हर्शल अहिरे आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा