Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २३ एप्रिल, २०२२

म्हसदी गावचा पाणी पुरवठा चा प्रश्न अखेर मार्गी लागला म्हसदी प.स.सदस्य राजधर देसले(माऊली) यांचा पाठपुराव्याला अखेर यश



मा.नामदार गुलाबराव पाटील
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र हे धुळे नंदूरबार जल जीवन पाणीपुरवठा आढावा बैठकीस आले असता पंचायत समिती सदस्य माऊली यांनी धुळे जिल्हा जिल्हाप्रमुख मा.तुळशिराम गावित यांच्या उपस्थितीत म्हसदी गावात अक्कलपाडा धरणातून पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन तसेच वसमार व रा.शेवाळी येथील पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईनची कामे मंजुर केली आहेत.ती विकास कामे लवकरात लवकर चालू करण्याचे आपण आदेश द्यावेत. तसेच म्हसदी परिसरात विविध विकास मंजुर करावीत. याविषयीचे निवेदन साक्री पंचायत समिती सदस्य अर्चना देसले प्रतिनिधी मां.पंचायत समिती सदस्य माऊली राजधर देसले यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.गुलाबराव पाटील यांना दिले. व ते निवेदन दिले असता मंत्री महोदयांनी त्या निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध