Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २५ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
खानदेशातील महत्त्वपूर्ण धुळे तथा नंदुरबार जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नितीन गडकरींनी दिले कोट्यवधी रुपयांचे पॅकेज
खानदेशातील महत्त्वपूर्ण धुळे तथा नंदुरबार जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नितीन गडकरींनी दिले कोट्यवधी रुपयांचे पॅकेज
धुळे व नंदूरबार जिल्ह्यासाठी परिवहन व रस्ते विकास मंत्रालय दिल्ली कडून १,७९१.४६ कोटी रुपये किंमतीच्या व २६०. ९ किमी लांबीच्या २ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे खासदार श्री Dr. Subhash Bhamre जी, खासदार Dr.Heena Gavit जी, माजी मंत्री श्री Girish Mahajan जी, धुळ्याचे पालकमंत्री श्री अब्दुल सत्तार जी, आमदार श्री कुणाल पाटील जी, आमदार श्री अमरिश पटेल जी तसेच इतर आमदार व अधिकारी यांच्या उपस्थितीत लोकार्पण व भूमिपूजन केले.
मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे रस्ते प्रकल्प उपयोगी ठरतील. धुळे-नंदुरबार जिल्ह्यांना आधुनिक तसेच उच्च प्रतीचे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी भारतमाला योजनेंतर्गत नियोजित या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची गुजरात, कर्नाटक व इतर राज्यांशी कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल. धुळे, चाळीसगाव शहरांतील वाहनांची रहदारी कमी होण्यास मदत होईल.
या रस्ते प्रकल्पांमुळे नागरिकांना पितळखोरा गुहा-लेणी व गौताळा अभयारण्य या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. विश्वप्रसिद्ध अजिंठा लेणी व दौलताबाद किल्ला तसेच चाळीसगाव रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होईल. धुळे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. शेवाळी-नंदुरबार रस्ते प्रकल्प परिसरातील आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल.
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली धुळे तथा नंदुरबार जिल्ह्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी तसेच क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा