Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
शिवाजी महाराज पुतळ्या जवळील अठ्ठावीस दुकानांसाठी महाविकास आघाडीचे निवेदन.... खऱ्या अतिक्रमीत दुकानदारांना डावलून बेकायदेशीर-लाभार्थी- चमचेगिरी करणाऱ्यांना अठ्ठावीस दुकाना वाटपाचा आरोप.... निवेदनात तत्कालीन सत्ताधारी रावल गट व आमदारांवर आरोप.... नपा.प्रशासक काळात डोळेझाक करून बेकायदेशीर दुकान वाटपाचा आरोप... युवक-बेरोजगारांना न्याय देण्यासाठी-माजी नगराध्यक्ष, शिवसेना-राष्ट्रवादी-युवक काग्रेस उतरली रस्त्यावर....
शिवाजी महाराज पुतळ्या जवळील अठ्ठावीस दुकानांसाठी महाविकास आघाडीचे निवेदन.... खऱ्या अतिक्रमीत दुकानदारांना डावलून बेकायदेशीर-लाभार्थी- चमचेगिरी करणाऱ्यांना अठ्ठावीस दुकाना वाटपाचा आरोप.... निवेदनात तत्कालीन सत्ताधारी रावल गट व आमदारांवर आरोप.... नपा.प्रशासक काळात डोळेझाक करून बेकायदेशीर दुकान वाटपाचा आरोप... युवक-बेरोजगारांना न्याय देण्यासाठी-माजी नगराध्यक्ष, शिवसेना-राष्ट्रवादी-युवक काग्रेस उतरली रस्त्यावर....
दोंडाईचा प्रतिनिधी - येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळील अनेक दुकानदांराचे मागील सात-आठ वर्षापुर्वी म्हणजे माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख यांच्या नगरपालीकेतील सत्तेच्या काळात ह्या पुतळ्याजवळ असलेल्या बेकायदेशीर-अनधिकृत टपऱ्या-दुकाना काढून, त्याठिकाणी तुम्हाला नवीन दुकाना नगरपालीका बांधून देईल, ह्या अटी-शर्तीवर अनेक दुकाना हटविण्यात आल्या होत्या व नगरपालीका उर्दू शाळेच्या जागेवर नगरपालीकेकडून अठ्ठावीस दुकानांचे बांधकाम सुरु करण्यात आले.
मात्र तोपर्यंत माजी मंत्री डॉ.देशमुखांची २०१६ मध्ये नगरपालीकेची एकहाती येणारी सत्ता गेली व सत्ता तत्कालीन रावळ गटाच्या ताब्यात आली व रावळ गटाने सत्ता काळ संपता-संपता शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अठ्ठावीस दुकानांचे बांधकाम पुर्ण केले व त्याठिकाणील खरे अतिक्रमीत दुकानदांराना डावलून दिवसातल्या-रात्रीत बेकायदेशीर-लाभार्थी-चमचेगिरी करणाऱ्यांना अठ्ठावीस दुकाना वाटप केल्याचा आरोप, आज महाविकास आघाडी तर्फे दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
यावेळी निवेदनात दिलेला आशय असा की,वरील विषयान्वये विनंती पुर्वक आम्ही अर्ज करतो की, दोंडाईचा येथील शिवाजी पुतळ्याजवळील नगरपालीकेच्या शाळेच्या जागेवर बांधण्यात आलेले शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या अठ्ठावीस दुकानांचे भारतीय जनता पाटींच्या पदाधिकाऱ्यांमार्फत बेकायदेशीररित्या वाटप करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की,शिवाजी रोडवरील पुतळा परिसरातील काढलेल्या अतिक्रमीत दुकानदारांना पर्यायी जागा म्हणून सदरहु कॉम्प्लेक्समधील दुकाने देणे बंधनकारक होते. सदरहु दुकानदारांनी नगरपालीकेच्या दुकानांसाठी नगर पालिकेत रितसर पैसे भरून पावत्या फाडल्या आहेत,असे असताना भाजपाचे आमदार जयकुमार रावल,माजी नगराध्यक्षा नयनकुँवरताई रावल,भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, माजी बांधकाम सभापती निखील राजपूत यांनी काल दिनांक २८/०४/२०२२ रोजी सदरहु जागेवर येऊन त्यांच्या नातेवाईकांना कार्यकत्यांना प्रथम अतिक्रमीत दुकानदारांचा हक्क डावलून वाटप करण्यात आले. त्याठिकाणी त्यांनी बेकायदेशीररित्या कुलूप लावून ताबा मिळविलेला आहे.
सदरहु नगरपालिकेने त्या जागेवर पाहणी करून नगरपालीका ताबा मिळवून कायदेशीररित्या ज्यांनी रितसर पैसे भरून पावत्या फाडल्या आहेत.तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी मा. दिलीप बंड साहेब यांच्या सुचनेनुसार व नगरपालिकेने केलेल्या ठरावानुसार कायदेशीररित्या वाटप करण्यात यावी, अन्यथा नगर पालिका प्रशासक विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, या अर्जाचा गांभीर्यान विचार करून सदरह दुकानांचा बेकायदेशीररित्या वाटप केलेल्या प्रक्रीयेला थांबवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी,असे निवेदनात स्पष्ट शब्दात दिले आहे.
यावेळी निवेदनावर माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र भास्कर देशमुख,शिवसेना उप-तालुकाप्रमुख शैलैश अशोक सोनार, काग्रेस युवाचे प्रदेश सरचिटणीस राहुल रामभाऊ माणिक,राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष दयाराम कुंवर,राजूदादा देशमुख,माजी नगरसेवक राकेश पाटील, सुहास साठे,बिलाल बागवान,रईस बागवान, विजय शिंपी,बशीर खाटीक, प्रताप सिन्धी,सचीन हरपाल जगताप,मोरे आँटो गँरेज,वर्मा टाईम्स,भिकन पिंजारी,
मंजूर धोबी,अशोक मराठे,रोहीदास सोनार, वासुदेव कुकरेजा,चंद्राबाई कुकरेजा,आबा चित्ते,बन्सीलाल कुकरेजा,विक्रम भील,
अशोक मालचे,ईश्वर पाटील,शिवा खंडाळे,
पिंटु खंडाळे,युवराज काकडे,सलीम पिंजारी,माजी बांधकाम सभापती भुपेन्द्र धनगर,नरेंद्र धात्रक,सागर पवार,रवि पाटील आदींच्या सह्या आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा