Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील अंत्यत प्रतिष्ठेची मानली जाणारी सामोडे ग्रामपंचायत जलशुद्धीकरण संच अखेर धूळ खात
साक्री तालुक्यातील अंत्यत प्रतिष्ठेची मानली जाणारी सामोडे ग्रामपंचायत जलशुद्धीकरण संच अखेर धूळ खात
सामोडे येथे मागील काही ४ ते ५ वर्षांपूर्वी मोठ्या धामधुमीत व मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ घेऊन बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण संच हे त्याच्या उदघाटन च्या वेळेपासून बंद अवस्थेत आहे वारंवार ग्रामपंचायत सामोडे यांच्याकडे या संबंधीची तक्रार करण्यात येत असूनही त्यास दुरुस्ती होत नाही, गावातील ग्रामस्थांना त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजाने अशुद्ध पाणी प्यावे लागते त्यांच्या आरोग्यास धोका उद्भवतो या संचाचा संबंधित कंपनीवर शासनाचा पैशांचा दुरुपयोग करणे व फसवणुकीचा गुन्हा टाकण्यात यावा व या संचास तात्काळ दुरुस्ती करून गावातील बेरोजगार तरुण अथवा बचत गटास चालविण्यास देण्यात यावे त्यामुळे त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल व त्यांस रोजगार देखील उपलब्ध होईल.
अश्या संबंधीची मागणी आज सामोडे ग्रामस्थांतर्फे प्रशासक श्री ए. पी.महाले यांकडे करण्यात आली त्यांच्या वतीने ग्रामसेवक श्री. बी.डी. जगताप यांनी निवेदन स्वीकारले निवेदन देतांना शिवसेनेचे अभय रविंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शंकर घरटे, भरत मोरे, योगेश शिंदे,आदि ग्रामस्थ उपस्थित होते
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा