Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापणारे पोलिसांच्या गळाला शिरपूर तालुक्यात पुन्हा बनावट नोटांची छपाई सावलदे येथे लाखोंच्या बोगस नोटा जप्त




शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाला मोठी कामगिरी करण्यात यश आले असून भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापणारे पोलिसांच्या गळाला लागले असून त्यांच्याकडून चलनाच्या एकूण २,२९०००/- रुपये बाजार मुल्याच्या बनावट नोटांसह एकूण ३७,०००/- रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन इसम यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ०६/०४/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,सावळदे ता. शिरपुर येथील राहणारा इसम नामे धनंजय शिरसाठ हा त्याचे राहते घरात भारतीय चलनाच्या बनावट नोटा छपाई करुन सावळदे येथील मुकेश प्रल्हाद कोळी याचे मार्फतीने बाजारात चलनात वापरत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन बातमीप्रमाणे सावळदे येथे जाऊन छापा टाकून कारवाई करुन इसम नामे १) धनंजय दिलीप शिरसाठ व २) मुकेश प्रल्हाद कोळी दोन्ही रा.सावळदे ता.शिरपूर जि.धुळे यांना ताब्यात घेऊन त्यांचे राहते घराची घरझडती घेतली असता धनंजय दिलीप शिरसाठ याचे राहते घरात भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणाऱ्या ५००/- रुपये दराच्या छपाई केलेल्या बनावट नोटांचे कागद तसेच बनावट नोटा छपाईसाठी लागणारे कोरे कागद,कलर प्रिंटर व साधन सामग्री असे मिळून आल्याने तो त्याचे साहाय्याने बनावट चलनी नोटांची छपाई करुन त्या बनावट चलनी नोटा मुकेश प्रल्हाद कोळी यास चलनात वापरण्यासाठी देत असल्याचे निष्पन्न इ. गले. 

त्यावरून मुकेश प्रल्हाद कोळी याचे राहते घराची झडती घेतली असता त्याचे राहते घरात बनावट चलनी नोटा तसेच बनावट चलनी नोटा छपाई केलेल्या कागदाचे कापलेले तुकडे असे मिळून आल्याने त्यांना सदर भारतीय चलनाच्या एकूण २,२९०००/- रुपये बाजार मुल्याच्या बनावट चलनी नोटा व एकूण ३७,०००/ रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध पोकों/१५९३ मुकेश गिलदार पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपूर शहर पोस्टे गुरनं. १९२/२०२२ भादंवि कलम ४८९(अ), ४८९ (क),४८९ (ड),४८९ (ई).३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यात अटक करुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.मप्रविणकुमार पाटील,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल माने शिरपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र देशमुख तसेच शोध पथकाचे पोउपनि,किरण बाहे,पोउपनि,
संदीप मुरकुटे,पोहेकॉ/ ललीत पाटील,
लादुराम चौधरी, पोकों/ मुकेश पावरा, विनोद आखडमल,गोविंद कोळी,प्रविण गोसावी,मनोज दाभाडे,उमाकांत वाघ,
प्रशांत पवार (आर.सी.पी.पथक),मपोकों नुतन सोनवणे,अनिता पावरा,रोशनी पाटील,प्रतिभा देशमुख चापोकों/ जितेंद्र मालचे,रविंद्र महाले अशांचे पथकाने केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध