Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत शिरपूर वरवाडे नगर परिषदतर्फे पर्यावरण दुत व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

                                                   
                                                  शिरपूर : सोमवार दि. ४ रोजी एस.एम.पटेल हॉल शिरपूर येथे संध्या.६ वा.माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शिरपूर वरवाडे नगर परिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्री बेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल व नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर आणि माजी उपनगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांच्या हस्ते  प्रभाग क्रमांक ०३ नगरसेविका, माजी सभापती शिक्षण मंडळ सौ.वैशाली वासुदेव देवरे यांचे प्रतिनिधी माजी उपनगराध्यक्ष वासुदेव शंकर देवरे यांना माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग नोंदविल्याने सन्मानीत करण्यात आले. 

तसेच प्रभाग क्रमांक १३ वरवाडे नगरसेविका,माजी सभापती शिक्षण मंडळ सौ.चंद्रकला संतोष माळी यांना सन्मानपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.भारजपा आध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष महारु माळी यांना पर्यावरण दुत म्हणुन सन्मानीत करुन अभिनंदन करण्यात आले.  

नगरसेवक, सभापती पाणी पुरवठा दिपक महादु माळी यांनाही सन्मानीत करुन अभिनंदन करण्यात आले. वरवाडे येथील पुंडलीक सखाराम माळी यांची सुन सौ.कल्पना प्रविण माळी यांना सर्वोत्कृष्ट पाककला स्पर्धेत प्रथम क्रमाक आल्याने सन्मानपत्र ,पुरस्कार देण्यात आला, अभिनंदन करण्यात आले व  स्पर्धेत सन्मानपत्र,बक्षिस चित्रकला स्पर्धेत निवृत्ती अशोक माळी , कमलेश विकास पाटील, साक्षी भरत माळी यांना देण्यात आले, तसेच रांगोळी स्पर्धेत कोमल महेश पाटील यांना सन्मानपत्र, बक्षिस देण्यात आले, या उपक्रमात,स्पर्धेत पुरस्कार प्राप्त करतांना जिल्हा धुळे सन्मानपत्र व पुरस्कार मिळाल्याबद्दल वरवाडे ग्रामस्थ, संत सावता माळी समाज मंदिर ट्रस्ट वरवाडे, सर्व मित्र परिवार,संत सावता माळी भजनी मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले .या सर्व कार्यात शि.व.न.पा.माझी वसुंदरा व स्वच्छ सर्वेक्षण संपुर्ण टीमचे विशेष सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध