Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

इंडियन ऑइल पेट्रोलियम कंपनी चा मनमानी कारभारामुळे साक्री तालुक्यातील आदिवासी पेसा क्षेत्रातील शेतकऱ्याचा जमिमी फुकट लाटण्याचा कंपनीचा प्रयत्न



इंडीयन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड पेट्रोलियम पाईपलाईन या कंपनीने पेट्रोल पाईपलाईन चे काम केल्याने त्याकामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-1966 चा कलम- 36 व 36 (1) व पेसा कायद्याचे उल्लंघन करुन पोलीस प्रशासनाला हाताशी धरून बेकायदा आदिवासी गोर-गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करत शेतकऱ्यांना योग्यती मोबदला न देता काम केल्याने संबंधित शेतकऱ्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग भारत सरकार यांच्याकडे तक्रार केली असता.आयोगाने तक्रारीची दखल घेऊन मा.जिल्हाधिकारी सो,धुळे व पोलीस अधीक्षक सो,धुळे तसेच संबंधित कंपनीचे चेअरमन यांना तुम्ही पेसा कायद्याचा उल्लंघन का केले.

असे नोटीस बजावून विचारना केले असता,त्यानुसार मे.आयोगाला समाधानकारक उत्तर न दिल्याने आयोगाने पुन्हा दि.13/4/2022 रोजी त्यांचे समक्ष उपस्थिती राहण्याची समज जारी केले असून त्यानुसार मा.जिल्हाधिकारी सो, धुळे व पोलीस अधीक्षक सो,धुळे तसेच संबंधित कंपनीचे चेअरमन यांनी दिल्ली आयोग दरबारी येऊन उत्तर द्यावे असे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध