Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

धुळे जिल्हा जात पडताळणी समितीचे वाभाळे निघाल्या नंतर तरी सुधारणा होईल का ?



जात आमची आणि पडताळणी करते समिती जात पडताळणी म्हणजे काय ? एखादी व्यक्ती त्या जातीची आहे का ? नाही त्याची पडताळणी समितीने करावी अर्थात जो अर्ज केला आहे त्या अर्जात नमूद कागदपत्रे तपासून तो या जातीचा आहे का ? नाही त्यांनी जोडलेले पुरावे खरे आहे का ? हेच काम जात पडताळणी समितीचे खरतर जात पडताळणी समितीची आवश्यकता नाही कारण जात प्रमाणपत्र उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी देतो मग पुन्हा जात प्रमाणपत्र तपासणी का ? जात प्रमाणपत्र देणार्या अधिकारीची नेमणूक सरकार करत सरकारने नेमणुक केलेल्या अधिकारीवर विश्वास नाही का ? त्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र पुराव्याचा आधारे दिले. 

असते तरीही जात प्रमाणपत्र पडताळणी करण्याची गरज काय ? जात पडताळणी कार्यालय म्हणजे लोकांची पिळवणूक करणारे कार्यालय आहे असे काॽ समजतात जात पडताळणी अर्ज ऑनलाईन भरला जातो चलन ही ऑनलाईन भरले जाते मग ऑनलाईन भरलेला अर्ज पुन्हा कार्यालयात येऊन जमा करण्याचा हट्ट का ? याचा अर्थ असा कि तुम्ही ऑनलाईन भरलेला अर्ज कार्यालयात दिसत नाही का ? पुन्हा कार्यालयात ऑफलाईन अर्ज जमा करायला सांगतात एकतर तुमचा ऑनलाईनवर विश्वास नाही.

आता नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले त्या अधिवेशनात पाचोरा चे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी धुळे जिल्हा जात पडताळणी कार्यालयात व्ही जे एन टी चे जात प्रमाणपत्र पडताळणी लवकर होत नाही त्याठिकाणी लोकांची पिळवणूक होते अशी तक्रार सामाजिक न्याय मंत्री यांच्या कडे केली होती. 

परंतु धुळे जिल्हा जात पडताळणी समितीच्या अधिकार्यांवर कार्यवाही होत नाही इतका मुजोर पणा आला कसा ? अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीॱना पाझर फुटला नाही धुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे वाभाडे निघाले त्यानंतर तरी सुधारणा होईल का ?

 तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध