Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

भोई समाज सेना धुळे तर्फे यशस्वी वधू-वर पालक परिचय मेळावा २०२२ याचे आयोजन भोई समाज सेना यांच्यामार्फत धुळे येथे कानुश्री मंगल कार्यालय येथे संपन्न



शिरपूर प्रतिनिधी:- दि.३ एप्रिल रोजी भोई समाज सेना तर्फे यशस्वी वधू-वर पालक परिचय मेळावा २०२२ याचे आयोजन भोई समाज सेना यांच्यामार्फत धुळे येथे कानुश्री मंगल कार्यालय येथे दिनांक 3 एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात आले.


या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करताना समाज गौरव पुरस्कार; समाज जागृती पुरस्कार तसेच मरणोत्तर समाज भूषण पुरस्कार संघटनेच्यावतीने महाराष्ट्रातील समाजातील मान्यवरांना केले गेले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा निवृत्ती कन्नेवाड साहेब जिल्हा कारागृह अधीक्षक मा खासदार सुभाष भामरे, मा. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार शरद पाटील सर भोई समाजातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते व संपूर्ण महाराष्ट्रातील भोई समाजाचे व भोई समाज सेनेचे तसेच इतर भोई समाज संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात विक्रमी तब्बल साडेपाचशे वधूवरांनी आपले नावे नोंदवली होती, त्यापैकी साधारण २०० ते २५० इच्छुक उमेदवारांनी परिचय दिला आणि कार्यक्रमाला सुमारे ५००० समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या


उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष माननीय भिलेश भाऊ खेडकर प्रदेशाध्यक्ष रोहित शिंगाणे, प्रदेश उपाध्यक्ष पुनमचंद मोरे, कार्याध्यक्ष मनोहर फुलपगारे सर सचिव किरण फुलपगारे सर, जिल्हाध्यक्ष वीरेंद्र फुलपगारे, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र फुलपगारे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, जिल्हा सचिव मच्छिंद्र फुलपगारे, यांच्यासोबत ज्येष्ठ मार्गदर्शक सतीश गोरख फुलपगारे, यांनी अहोरात्र मेहनत घेतली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध