Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ एप्रिल, २०२२
राज्यात पोलिसांची संख्या अपुरी एक लाख लोकसंख्येमागे १६९ पोलीस मुंबई पोलिस
महाराष्ट्र राज्याची सन २०२१ ची अंदाजित लोकसंख्या १२ कोटी ४९ लाख असून राज्यातील पोलिसांची संख्या २ लाख ११ हजार १८३ असून एक लाख लोकसंख्येमागे १६९ पोलीस उपलब्ध आहेत तर महिला पोलिसांची संख्या राज्यात केवळ २७ हजार १६७ इतकी असून राज्याच्या पोलिस संख्याबळाच्या तुलनेत केवळ १२.८६ % असल्याचे समर्थन संस्थेच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
राज्यात पोलिस अधिकारी व कर्मचारी मिळून २ लाख ११ हजार १८३ पदे मंजूर असून त्यापैकी ८३ हजार ६१८ पोलिसांना केवळ निवासस्थाने उपलब्ध आहेत तर ७१ हजार ८२४ पोलीस राज्यात निवास स्थानापासून वंचित आहेत.म्हणजे ३४.१ टक्का पोलीस हक्काच्या निवासस्थानापासून वंचित आहे जगात अव्वल समजल्या जात असणाऱ्या मुंबई पोलिसांचे संख्याबळ केवळ ५० हजार ४१५ इतकेच आहे त्यातील २२२२० पोलिसांना निवासस्थान उपलब्ध असून २८ हजार १९५ म्हणजे ५५.९३% पोलीस निवासस्थानापासून वंचित आहेत.
राज्याची लोकसंख्या व पोलिसांची राज्यातील संख्या बघता राज्य अर्थसंकल्पाच्या शंभर रुपयाच्या तुलनेत गृह विभागाला फक्त पाच रुपये चाळीस पैसे मिळतात मात्र त्यांच्याकडून कामगिरी मात्र कितीतरी पटीने अधिक प्रमाणात करून घेतली जाते.सरकार कोणतेही असो पोलिसांना देण्यात येणारे वेतन व सोयी सुविधा व त्यांच्या मार्फत त्यांच्याकडून करून घेण्यात येणारे काम याचा कधीच ताळमेळ बसत नाही.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून व सत्तेतील राज्यकर्त्यांकडून पोलिसांना मिळणारी वागणूक व कामाचे ताप यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
कायदा व सुव्यवस्था राखणे,गुन्ह्याचा शोध घेणे,गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे,गुन्हे टाळणे, गुन्हेगारांवर खटले भरणे,कैद्यांबरोबरच शासकीय मालमत्ता त्याचबरोबर खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, वाहतूक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणे, स्फोटके व घातक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या व साठवणूक करणाऱ्यांवर देखरेख ठेवणे या व्यतिरिक्त सामाजिक आर्थिक सलोखा राखण्यासाठी पुढाकार घेणे इत्यादी कामे पोलिसांना करावी लागतात.राज्यात मुंबई,ठाणे,तळोजा, येरवडा,कोल्हापूर,नाशिक रोड,औरंगाबाद, अमरावती,नागपूर,मध्यवर्ती कारागृह तर ३७ जिल्हा कारागृह तसेच रत्नागिरी विशेष कारागृह,मुंबई महिला कारागृह, नाशिक किशोरवयीन मुलांसाठी सुधारित कारागृह, तर मोर्शी गडचिरोली,पैठण,येरवडा, औरंगाबाद,विसापूर,अमरावती,नागपूर, अकोला,नाशिक रोड,कोल्हापूर,येरवडा, महिला खुले कारागृह ठाणे,यवतमाळ, धुळे,लातूर,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,इत्यादी १९ कारागृहे कार्यरत आहेत.
या सर्व कारागृहातील बंदी शमता २४ हजार ७२२ असून एकूण बंदी ३७ हजार ३१७ म्हणजे १२ हजार ५९५ बंदी कारागृहातील क्षमतेपेक्षा जास्त आहेत. २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत जिल्हा कारागृह १,२,व ३ यांची एकत्रित बंदी क्षमता २३ हजार ९४२ इतकी होती.त्यामध्ये ३७ हजार ३१७ बंदी ठेवण्यात आले होते म्हणजे उपलब्ध क्षमतेपेक्षा दीडशे टक्के म्हणजे १२,५९५ अधिक बंदी कारागृहात अधिक प्रमाणात डांबून ठेवून मानवी हक्क कायद्याचे उल्लंघन करण्यात आले होते.
राज्यातील मध्यवर्ती कारागृह १५,५०० बंदी शमता असताना २६ हजार ५५६ बंद ठेवण्यात आले होते म्हणजे ११०५६ बंदी अतिरिक्त होते तर जिल्ह्यातील इतर कारागृहांमध्ये ९ हजार २२२ कैदी क्षमता असताना १० हजार ७६१ कैदी ठेवण्यात आले होते म्हणजे १५३९ कैदी अतिरिक्त होते.
राज्यात मुंबई व पुण्यासह तुरुंगामध्ये शमते पेक्षा जास्त कैदी असल्याने व तुरुंगाची स्थिती समाधानकारक नसल्याने त्याबाबत चिंता व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई व पुण्यात अतिरिक्त तुरुंगाची उभारणी करण्याकरता राज्यसरकारने तीन महिन्याच्या आत योग्य ती पावले उचलावीत असा आदेश राज्य सरकारला दिला आहे त्याचप्रमाणे राज्यातील तुरूंगात असलेल्या हजारो कायद्यांच्या आरोग्याबाबत जिल्हावार आहार तज्ञांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आकस्मिकपणे तपासणी करावी असे आदेश असतानाही मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही
देशात गुन्हेगारीत महाराष्ट्र पाचव्या स्थानी
देशात ज्याप्रमाणे गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे ही घटना गंभीर असून महाराष्ट्र पाचव्या स्थानी असल्याने त्याहून गंभीर असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. सन २०२० मध्ये संपूर्ण भारतात ६६ लाख १२८५ पुण्याची नोंदणी त्यात तामिळनाडू मध्ये १३ लाख ७७ हजार ६८१ मध्यप्रदेश मध्ये ६ लाख ९९ हजार ६१९, उत्तर प्रदेश मध्ये ६ लाख ५७ हजार ९२५, केरळ मध्ये ५ लाख ५४ हजार ४२४ तर महाराष्ट्रात ५ लक्ष ३९ हजार तीन इतके गुन्हे नोंद करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र गुन्हेगारी बाबतीत पाचव्या स्थानावर असल्याचे सिद्ध झाले आहे. सन २०१९ मध्ये महाराष्ट्रात ५ लाख ९ हजार ४३३ गुन्ह्यांची नोंद झाली. तर २०१९ च्या तुलनेत सन २०२० मध्ये पाच लक्ष ३९,००० तीन इतक्या गुन्ह्यांची नोंद झाली. २९ हजार ५७० इतके गुन्हे अधिक महाराष्ट्रात घडले महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण ५.४९ टक्के आहे.
महिला अत्याचारात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी सन २०२० मध्ये भारतात महिलांवरील अत्याचाराचे ३ लाख ७१ हजार ५०३ एवढ्या गुन्ह्यांची नोंद झाली. त्यामध्ये प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश या ठिकाणी ४९ हजार ३८५ म्हणजे १३.२९ % टक्के दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान असून या राज्यात ३४ हजार ५३५, उत्तर महाराष्ट्रात ३१ हजार ९५४ गुन्ह्यांची नोंद झाली. एकंदरीत महाराष्ट्र महिला अत्याचारांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे.
सन २०२० मध्ये मुलांवरील अत्याचारात देशभरात १ लाख २८ हजार ५३१ गुन्हे नोंदविले गेले. त्यापैकी सर्वाधिक जास्त मध्य प्रदेशात १७,००८ म्हणजे १३.२३ टक्के, उत्तर प्रदेशात १,५०,००२७१, म्हणजे ११.८८ टक्के तर महाराष्ट्रात १४३७१ म्हणजे ११.८ टक्के गुन्हे नोंद झाली.अनुसूचित जातीच्या व्यक्तींवर देशात ५० हजार २९१ गुन्हे नोंदविले गेले त्यापैकी महाराष्ट्रात २,५६९ म्हणजे ५.११ टक्के गुणांची नोंद केवळ महाराष्ट्रात झाली. अनुसूचित जमाती वरील देशात ८ हजार २७२ गुन्हे नोंदविले त्यापैकी मध्यप्रदेशात २४०१ म्हणजे २९.२ टक्के, राजस्थान मध्ये १८७८ म्हणजे २२.७० टक्के तर महाराष्ट्रात ६६३ म्हणजे केवळ ८.१ टक्के गुन्ह्यांची नोंद झाली. भारतात ज्येष्ठ नागरिकांवर २४ हजार ७९४ गुन्हे नोंदविले गेले त्यापैकी सर्वात जास्त ४९०९ गुन्हे महाराष्ट्रात नोंदविले गेले त्यांचे प्रमाण १९.८० टक्के होते.
आर्थिक गुन्हेगारीची भारतात १ लाख ४५हजार ७५४ प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी सर्वात जास्त राजस्थान मध्ये १८ हजार ५२८ म्हणजे १२.७१ टक्के, उत्तर प्रदेश मध्ये १६ हजार ७०८ म्हणजे ११.४६% टक्के तर तेलंगणामध्ये १२९८५ म्हणजे ८.९१% टक्के तर महाराष्ट्रात १२४५३ म्हणजे ८.५४ टक्के प्रकरणे नोंदवली गेली.भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल स्थानी भ्रष्टाचारामध्ये देशात हाहाकार माजला असताना महाराष्ट्र देखील त्यात कमी नाही भ्रष्टाचाराच्या देशात ३ हजार १०० इतक्या गुन्ह्यांची यांची नोंद झाली त्यापैकी महाराष्ट्रात ६६४ म्हणजे २१.४२ टक्के गुन्हे नोंदविले गेले.त्यामुळे भ्रष्टाचार प्रकरणात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सायबर क्राईम के देशात ५००००५३५ एवढ्या गुन्ह्यांची नोंद झाली त्यापैकी उत्तर प्रदेशात ११०९७ असून उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर असून त्याचे प्रमाण २२.१८ टक्के आहे तर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून या राज्यात १० हजार ७४१ म्हणजे २१.४७ % टक्के, तिसर्याल क्रमांकावर महाराष्ट्र राज्य असून या ठिकाणी ५ हजार ४९६ म्हणजे १०.९८ टक्के गुन्ह्यांची नोंद झाली राज्य विरोधात भारतात ५६१३ गुन्हे नोंदविले गेले. त्यात प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश असून २२१७ म्हणजे ३९ टक्के तर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्य असून या ठिकाणी ६६८ गुन्हे नोंदविले गेले. त्याचे प्रमाण ११.९० टक्के तिसऱ्या क्रमांकावर आसाम राज्य असून त्या ठिकाणी ३३३ म्हणजे ५.९३ टक्के तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून २५२ म्हणजे ४.४९ टक्के गुन्हे नोंद नोंद करण्यात आले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुका कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक परियोजने अंतर्गत भुईमूग शेंगा बियाणे शंभर टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले साक्री ता...
-
साक्री तालुका कृषी विभाग अंतर्गत खरीप पिक परियोजने अंतर्गत भुईमूग शेंगा बियाणे शंभर टक्के सबसिडीने शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले साक्री ता...
-
शिंदखेडा तालुक्यातील दहिवेल (ता. शिंदखेडा) येथे घडलेली एक घटना अपघात असल्याचे प्रथमदर्शनी भासवत असली, तरी नरडाणा पोलिसांनी तपासाचा धागा पकडत...
-
बेटिवद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात मागील दोन दिवसांपासून हलकासा रिमझिम पाऊस पडत होता.मात्र,आज शुक्रवार दि.२७ जून रोजी दुपा...
-
शिरपूर : शिरपूर पिपल्स को. ऑप. बँकेत १ कोटी ६६ लाख ५८ हजार ८५१ रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेचा कनिष्ठ अधिकारी यो...
-
मुंबई: महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधान...
-
बेटावद प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे मा.एकनाथ राव खडसे यांच्या मालकीच्या खडसे फार्म्स,जळगांव येथून आलेल्या उच्च प्रतीच्या 10...
-
मानवाच्या ज्याप्रमाणे अन्न,वस्त्र व निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत,त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा चौथी मूलभूत गरज बनलेली असल्याने शेवटी जो शिक...
-
शिरपूर प्रतिनिधी - 26 जुन शिरपूर येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शिरपूर शहर पोलीस स्टेशन...
-
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – औद्योगिक क्षेत्रातील दर्जेदार उत्पादन व ग्राहकविश्वासाच्या बळावर अल्पावधीत यशाची घोडदौड करणाऱ्या लु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा