Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १७ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्य शासनाच्या रुग्णालयीन सेवेला घर घर आरोग्य व्यवस्थेबाबत शासनाचे उदासीनतेचे धोरण मुंबई - मिलिंद माने
राज्य शासनाच्या रुग्णालयीन सेवेला घर घर आरोग्य व्यवस्थेबाबत शासनाचे उदासीनतेचे धोरण मुंबई - मिलिंद माने
जागतिक आरोग्य सेवेच्या निकषानुसार ४० लाख लोकसंख्येमागे एक रुग्ण खाट असणे आवश्यक असताना राज्यात मात्र ४ हजार २६४ लोकांमध्ये एक रुग्ण खाट असल्याचे निष्पन्न झाले आहे. याचा अर्थ आपत्कालीन परिस्थितीत गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी.
राज्याची अंदाजित लोकसंख्या १२ कोटी ४९ लक्ष असून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची संख्या ५०३ आहे. यामध्ये रुग्ण खाटांची संख्या २६ हजार ८२३ आहे. राज्याची सरासरी गरज लक्षात घेता २ लाख ३४ हजार ६०० लोकसंख्येमागे एक रुग्णालय आवश्यक आहे. तसेच जागतिक आरोग्य सेवेच्या निकषानुसार चाळीस लोकसंख्येमागे एक रुग्ण खाट असणे आवश्यक आहे मात्र राज्यात ४०,१०,२६४ लोकांमध्ये एक रुग्ण खाटउपलब्ध आहे. सध्या राज्यात २३ जिल्हा रुग्णालय असून खाटांची संख्या ६ हजार १६९ तर 100 खाटांची ३२ उपजिल्हा रुग्णालय असून खाटांची संख्या ३२०० आहे. तर पन्नास खाटांची साठ उपजिल्हा रुग्णालय असून खाटांची संख्या तीन हजार आहे. तर पंधरा स्त्री रुग्णालय असून खाटांची संख्या १८२० आहे तर ८ सामान्य रुग्णालय असून खाटांची संख्या १५१४ आहे तर ३० खाटांची ३६२ ग्रामीण रुग्णालय असून खाटांची संख्या १० हजार ८६० आहे इतर एक रुग्णालय खाटांची संख्या ६० आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय दोन असून खाटांची संख्या २०० आहे. सन २०१७/१८ मध्ये राज्यातील जिल्हा रुग्णालयांची संख्या २३ होती व खाटांची संख्या ७०३७९ होती तर २०२१ मध्ये जिल्हा रुग्णालयात कोणतीही वाढ झालेली नाही वाढत्या लोकसंख्येनुसार नाद रुग्णालयांमध्ये वाढ झाली ना रुग्णालयातील खाटा मध्ये मध्ये वाढ झाली.
राज्यातील आरोग्य सेवेला सक्षम करण्यासाठी व सक्षम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आवश्यक आहे मात्र राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात जिल्हा परिषदेतील कर्मचारी वगळता ६५ हजार ६३४ पदे मंजूर असताना ४२ हजार ९० पदे भरली आहेत तर आरोग्य विभागातील गटाची १० हजार ९०६ पदे रिक्त आहेत.
राज्यात स्त्रीभ्रूणहत्या वाढल्या
प्रसूतीपूर्व लिंग निदान ना साठी होणाऱ्या दुरुपयोग आवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रसूतीपूर्व निदानतंत्र (विनिमय व दुरुपयोग) हा प्रतिबंधक कायदा १९९४ पासून राज्यात लागू करण्यात आला आहे तरी देखील राज्यात सप्टेंबर २०२१ अखेर १० हजार १५६ सोनोग्राफी केंद्राची राज्यात नोंदणी झालेली आहे परंतु या कायद्याचा तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी सन दोन हजार वीस एकवीस या काळात सहाशे सात प्रकरणे दाखल झाली आहेत पूर्व गर्भधारणा आणि प्रसूतीपूर्व निदानतंत्र कायद्याच्या तरतुदीचा भंग करणारे प्रकरणे राज्यात वाढली तर मात्र आपल्या राज्यात देखील हरियाणा सारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही
राज्याच्या आरोग्य विभागात २० हजार ५४४ पदे रिक्त
महाराष्ट्र राज्याला सक्षम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आवश्यक आहे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात जिल्हा परिषदेतील कर्मचारी वगळता उपलब्ध असणारा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांची ६२ हजार ६३४ पदे मंजूर असताना फक्त ४२ हजार 90 पदे भरली आहेत तर २० हजार ५४४ पदे आजही रिक्त आहेत म्हणजे मंजूर झालेल्या असलेल्या पदांपैकी ३३ टक्के पदे रिक्त आहेत. वैद्य राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११३५० पदे मंजूर असताना ९३८६ पदे भरली असून १९५५ पदे रिक्त आहेत. वर्ग-1 या महत्त्वाच्या वैद्यकीय तज्ञ पदांची ६७६ पदे मंजूर असताना फक्त १७० पदे भरली आहे म्हणजे तब्बल ५०६ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची टक्केवारी ७५ टक्के आहे. यावरून राज्य शासन आरोग्य विभागा बाबत उदासीनता धोरण अवलंबत असल्याचे चित्र दिसत आहे. आरोग्य सेवा यांच्या अंतर्गत संवर्गात ११३५० पदे मंजूर असून त्यापैकी ९३८६ पदे भरली गेली आहेत १९६४ पदे रिक्त आहेत.
राज्याची आरोग्य परिवहन सेवा आजारी
राज्यातील आरोग्य विभागाची ११०१ वाहने बंद ८६८ आरोग्य उपकरणे नादुरुस्त आहेत राज्यातील आरोग्य विभागाची ५५४२ वाहने असून ४४४१ चालू स्थितीत आहेत तर ११०१ बंद अवस्थेत आहेत. म्हणजे २० टक्के वाहने बंद अवस्थेत आहेत. राज्य शासन शासन विकासाचे चित्र जाहिरातीद्वारे निर्माण करीत आहे मात्र वास्तव या सर्व आकडेवारीवरून भयान असल्याचे दिसत आहे राज्यात आरोग्य सेवा आजारी असल्याने शहरी व ग्रामीण भागातील जनतेला त्याचा नाहक त्रास होत आहे भविष्यात आरोग्याबाबत आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास आपली आरोग्य यंत्रणा त्यास तोंड देण्यात जराही सक्षम नसल्याचे चित्र या पूर्ण आकडेवारीवरून पाहण्यास मिळत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ होईल तेव्हा खऱ्या अर्थाने राज्य विकास व प्रगती करीत असल्याचे सिद्ध होईल.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर-तालुक्यातील खापरखेडा प्र.डा.येथे व शहरातील पैलाड येथे अशा दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. खापरखेडा...
-
अमळनेर : विना परवाना बैलांची कोंबून वाहतूक करणाऱ्या बेटावद येथील इसमाला वाहनासह चोपडा येथील गोरक्षकांनी तालुक्यातील झाडी येथे पकडून दोन बैल...
-
शिरपूर/ प्रतिनिधी तत्कालीन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या कार्यकाळात धुळे जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळा झाल्याचे आणि ...
-
आळे दि. १७ - आळे गावचे नविनियुक्त सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सखाराम(मुकुंद) भंडलकर यांचा रामोशी समाज बांधव व जय मल्हार क्रांती संघटना महाराष...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिक्षण हे पवित्र क्षेत्र ओळखले जाते.परंतु या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने धुळे जिल्ह्यात ४५० शालार्थ आयड...
-
नवागत विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत बेटावद शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा, मुडावद येथे आज शाळा शुभारंभ दिन मो...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या हद्दीत स.नं. ६/१/ब/१/ब मध्ये स्थानिक पातळीवर माजी नगरसेवकाच्या मुलीने खुल्या जागेवर अतिक्रमण क...
-
बेटावद, ता. शिंदखेडा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय ...
-
अमळनेर : येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टरेड पदवी प्रदान करण...
-
सप्रेम नमस्कार सध्या खरीप हंगामासाठी बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यातच साक्री शहरांत मका बियाणे खरेदी मध्ये चढ्या भावान...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा