Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १७ एप्रिल, २०२२
खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते स्व.ईश्वरदास चौधरी यांच्या प्रतिमेचे अनावरण
निंभोरा तालुका रावेर प्रतिनिधी:
येथील रेणुकादेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ द्रौपदाबाई रामदास चौधरी माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.ईश्वरदास चौधरी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी आपल्या मनोगतातून स्व.ईश्वरदास चौधरी यांची गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची गंगोत्री निंभोरा स्टेशन परिसरात स्थापन करून येथील मुला मुलींना जवळच त्यांच्या परिसरात ही शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली .यातून शिक्षणाने समाजाचे बळकटीकरण होऊन समाजाचा विकास साधला जातो असे आपल्या मनोगतात सांगितले.या प्रतिमा अनावरण कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सायरा खान मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शाळेच्या स्थापनेपासूनचा लेखाजोखा मांडत त्यावेळेस लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले.व संस्थापक अध्यक्ष स्व.ईश्वरदास चौधरी यांच्या मार्गदर्शन बाबतीच्या आठवणींना उजाळा दिला.या वेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल प्रल्हाद बोंडे इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .या प्रतिमा अनावरण कार्यक्रमप्रसंगी रावेर यावलचे आमदार शिरीष दादा चौधरी तसेच मसाकाचे चेअरमन शरद महाजन,तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,कृषी बाजार उत्पन्न समिती रावेरचे उपाध्यक्ष श्रीकांत महाजन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भाजपा भरत महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,धनंजय चौधरी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती रावेरचे सदस्य दुर्गादास पाटील,राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका ओबीसी सेल अध्यक्ष सुनील कोंडे,निंभोरा ग्रामपंचायत सरपंच सचिन महाले,उपसरपंच सौ रंजनाताई पाटील,सौ नीताताई नरेंद्र ढाके,निंभोरा फ्रुटसेल सोसायटी अध्यक्ष मोहन बोंडे जीवनगौरव पुरस्कारप्राप्त डॉ एस डी चौधरी,न्यू इंग्लिश स्कूल निंभोरा चे अध्यक्ष रोहिदास ढाके,निंभोरा पोलिस स्टेशनचे एपीआय गणेश धुमाळ सिंगतचे सरपंच प्रमोद चौधरी दत्तात्रय पवार नामदेव खंडू पतसंस्थेचे अध्यक्ष युनूस खान शफी खान ग्रामपंचायत सदस्य नाना पाटील अमोल खाचणे,प्रशांत पाटील,प्रकाश खाचने, रोशन बोंडे,पंडित चिमणकारे,प्रमोद भंगाळे,रविंद्र नेहेते,पत्रकार काशिनाथ शेलोडे,दस्तगिर खाटिक तसेच रेणुका देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे ध्रुव ईश्वरदास चौधरी,हेमंत नेमाडे,ज्ञानदेव नेमाडे,नरेंद्र शेठ ढाके प्रभाकर कोळंबे,प्रमोद भोगे,सुधाकर भंगाळे तसेच गौरव ढाके,डेव्हिड ढाके,धीरज भंगाळे इ.मान्यवर हजर होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा नेमाडे मॅडम यांनी केले तर आभार नरेंद्र दोडके सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीते साठी सूर्यकांत पाटील सर चंद्रकांत देशमुख सर हेमलता नेमाडे मॅडम, गोकुळ भोई सर उदय अवसरमल सर सरफराज तडवी सर,गौरव नेमाडे,मुकुंदा, फालक,तुषार भंगाळे व शाळेतील सर्व विद्यार्थांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा