Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १८ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा भरून मुंबईत विक्रीसाठी जाणारे चार कंटेनर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पुरमेपाडा (ता.धुळे) गावाजवळ पकडले. या कारवाईत पथकाने तब्बल एक कोटी ३० लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. गुरख्यासह वाहने व मोबाईल असा एकूण जप्त मुद्देमाल तब्बल एक कोटी ९० लाखावर आहे
राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा भरून मुंबईत विक्रीसाठी जाणारे चार कंटेनर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पुरमेपाडा (ता.धुळे) गावाजवळ पकडले. या कारवाईत पथकाने तब्बल एक कोटी ३० लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. गुरख्यासह वाहने व मोबाईल असा एकूण जप्त मुद्देमाल तब्बल एक कोटी ९० लाखावर आहे
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा भरून चार कंटेनर (एनएल- ०१/ एसी- ८०९७, एचआर-५५/ एई- ३१७७, एचआर- ३८/ डब्ल्यू- ३२८३,एचआर- ३८/ वाय-९६४०) दिल्ली येथून धुळे जिल्ह्यातील हेंद्रुण-मोघण, मालेगावमार्गे मुंबई शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती.
या माहितीवरून त्यांनी कंटेनरचा शोध घेण्याचे आदेश पथकाला दिले. धुळे,तालुक्यातील आर्वी गावाच्या पुढे पुरमेपाडा गावाजवळ संबंधित चारही कंटेनर एका मागे एक जात असल्याचे दिसल्याने पथकाने चारही कंटेनर थांबवून वाहनचालकांचे नाव, गाव विचारले.साबीर माजिद खान (रा.ग्राम घासेरा ता.जि.नुहू, हरीयाणा, शकील अहमद लियाकत अली (रा.ग्राम भडंगाका,ता.जि.नुहू), रुकमोद्यीन अयुब खान (रा.ग्राम हिरवाडी,ता. फिरोजपुर झिरका, जि.नुहू),मुरसलिम रुजदार (रा.ग्राम सोमकी,ता.नगर,जि. भरतपुर),नसिम खान अली मोहम्मद खान ( रा. ग्राम अलिगड गुंडवास,ता.जि. पलवल) अशी त्यांनी आपले नाव, पत्ता सांगितले.उडवाउडवीचे उत्तरे
कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस करता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे कंटेनरसह त्यांना मोहाडी नगर पोलीस ठाणेच्या आवारात आणले. कंटेनरची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा मिळून आला. याप्रकरणी गौतम सपकाळे यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.बुधवंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, रफिक पठाण, श्री. सपकाळे, राहुल सानप, प्रकाश सोनार, संदीप सरग, कैलास महाजन, संजय सुरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा