Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

साक्री तालुक्यातील सर्वात मोठीं कांदा विक्री होणारी बाजारपेठ म्हणजे पिंपळनेर कृषी उत्पन्न उप बाजार समितीचा मनमानी कारभार विरुध्द कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निवेदन



कृषी उत्पन्न उपबजार समिती पिंपळनेर येथील कांदा लिलाव अजूनही सुरू झाला नसून यंदा कांदा लिलाव चे ठिकाण काही मोजके व्यापारी व बाजार समितीचे काही अधिकारी यांच्या संगनमताने शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचे शेतकऱ्यांना कळताच एकच संतापाची लाट उसळत असताना हा अन्यायी व शेतकाऱ्यांचा विरोधातील निर्णय माग घेऊन आधीच्या ठिकाणी किंवा त्याच्याच समोर उपलब्ध असलेली जागा येथे सुरू करावी जेणे करून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना व परिसरातील नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही या संबंधीची मागणी शेतकऱ्यांकडून आज बाजार समितीचे सचिव श्री. अशोक मोरे यांना करण्यात आली, यावेळी श्री.सुधाकर भदाणे, अभय शिंदे, विनोद भदाणे,निलेश शिंदे,भूषण शिंदे,संजय जगताप,पवन घरटे,किशोर सावळे,प्रशांत भदाणे व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते, यासाठी संबंधित जागेसाठी शेतकऱ्यांकडून मध्यस्थी करण्यात आली असून पुढील निर्णय बाजार समिती चे अध्यक्ष श्री पोपटराव सोनवणे घेतील असे सचिव यांच्या कडून सांगण्यात आले, परंतु शेतकरी विरोधात कुठलाही निर्णय घेऊन लिलाव सुरू करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून हाणून पाडण्यात येईल व तीव्र आंदोलन उभे केले जाईल असे शेतकऱ्यांनी बाजार समितीला इशारा देण्यात आला

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध