Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

आदर्श विकास मंडळ शिरपूर व सी.एम भोई सर यांना समाज जागृती पुरस्कार प्रदान



शिरपूर प्रतिनिधी:धुळे येथे दि.3 एप्रील वार रविवार रोजी भोई समाज सेनेचा वतीने राज्यस्तरीय भोई समाज वधू वर परीचय मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यासाठी राज्यभरातून वधूवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वधूवर परीचय मेळाव्यास धुळे जिल्ह्याचे खासदार बाबासाहेब सुभाष भामरे,माजी.आमदार बाबासाहेब राजवर्धन कदमबांडे,माजी आमदार प्रा.शरद पाटील.अधिक्षक जिल्हा कारागृह यांची विशेष उपस्थिती लाभली.ह्या मेळाव्यात आदर्श विकास मंडळ शिरपूर यांचे आतापर्यंतचे,शैक्षणिक काम,सामाजिक श्रेत्रातील काम,समाज मेळावे,गुणगौरव सोहळे,परीचय मेळावे,जयंती उत्सव, तंटामुक्तीचे आदर्श काम,या सर्व कार्याची दखल घेत भोई समाज सेनेचा वतीने "आदर्श विकास मंडळ शिरपूर " यांना  मान्यवरांचा हस्ते विशेष समाज जागृती पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष भाईदास मोरे,संस्थापक अध्यक्ष सी.एम भोई सर,सदस्य गुलाब भोई, प्रा.डॉक्टर आर.एम.वाडीले सर,शिक्षक यशवंत  निकवाडे,रविंद्र सोनवणे,भोजराज ढोले, जगदीश मोरे,सुदाम मोरे,दिलीप ढोले हे उपस्थित होते.

आदर्श विकास मंडळ शिरपूरला हा  पुरस्कार म्हणजे ख-या अर्थाने शिरपूर येथील समाज बांधवांच्या गौरव आहे.ह्याच कार्यक्रमात समाजात नेहमीच सक्रिय असणारे,हिरीरीने समाज कार्यात भाग घेणारे,समाज हिताचे निर्णय घेणारे,समाज  प्रबोधन करणारे,समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिरपूर येथील आदर्श विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सी.एम भोई सर यांना देखील भोई समाज सेनेच्या वतीने "समाज जागृती पुरस्कार "देवुन  मान्यवरांचा हस्ते गौरविण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध