Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० एप्रिल, २०२२
वेळ जवळ आलीय...',गिरीश महाजनांनी दिले भाजप- मनसे युतीचे स्पष्ट संकेत
जळगाव,मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक पावित्रा घेतला होता. मशिदींवरील भोंग्यांसमोर लाऊ़डस्पीकर लावून हनूमान चालीसा वाजवण्याचा इशारा दिला होता. या त्याच्या भूमिकेच भाजप नेत्याकडून कौतूक करण्यात आले होते. या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या भूमिकेनंतर भाजप-मनसे युतीच्या (BJP-MNS Alliance) चर्चांना उधाण आले होते.त्यात आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भाजप-मनसे युतीचे (BJP-MNS Alliance) संकेत दिले आहेत.
जळगाव येथे होमिओपॅथी संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) उपस्थित होते.यावेळी माध्यमांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना भाजप-मनसे युतीबाबतचा (BJP-MNS Alliance) प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी 'वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत', असं म्हणत गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) यांनी युतीचे संकेत दिले होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यासंदर्भात बोलल्यानंतरच आपल्याला कळेल, त्यांच्या मनात काय आहे आणि ते काय बोलणार आहेत, हे आम्ही सांगू शकत नाहीत . पण 'वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत', बघूया, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी निषेध केला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, मात्र ही वेळ का आली असा सवाल उपस्थित करत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
होमिओपॅथी संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉक्टरांच्या संख्येवरून बोलताना, आम्ही पुढारी लोक इतके लाख लोक आमच्या सभेत होते, इतक्या लाखांची आमची सभा झाली व तसे आम्ही पेपर ला छापूनही आणतो मात्र प्रत्यक्षात पाच ते सात हजार लोक सभेत असतात असे असे वादग्रस्त वक्तव्य गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा