Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर नलसे जल' ही योजना अनेक ठिकाणी सुरु : अरुण धोबी



शिरपूर प्रतिनिधी : पाण्यासाठी नागरिकांना एक-दोन किलोमीटर दूर अंतरावरुन पाणी आणावे लागते.त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुध्द पाणी पुरवण्यात आले असुन 'हर घर नलसे जल' ही योजना सुरु केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सामाजिक न्याय पंधरवाडा अंतर्गत हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधीपक्ष नेते ना.देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांचा मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविण्यात आले. 

धुळे जिल्हा ग्रामीण भाजपा तर्फे तालुकास्तरावर व बूथस्तरावर नुकतेच 'हर घर नलसे जल' अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले असुन जिल्ह्याभरात हे अभियान यशस्वी झाले.भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांचा सूचनेनुसार शिरपूर तालुक्यात अनेक ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले असल्याची माहिती हर घर नलसे जल प्रमुख तथा धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी दिली. केंद्र शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर नलसे जल' ही योजना अनेक ठिकाणी सुरु आहे. 

याबाबत धुळे जिल्हा शिरपूर तालुक्यातील ग्रामिण भागात तर शहरातील अनेक भागात जलजीवन मिशनच्या अंतर्गत देशासह जिल्ह्यात व तालुक्यात बर्‍याच ठिकाणी कामांना मोठ्या प्रमाणात प्रारंभ झाला असल्याची माहिती नागरीकांना हर घर नलसे जल प्रमुख तथा धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी दिली यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील अनेक नागरीक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध