Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ एप्रिल, २०२२
Home
/
Unlabelled
/
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर भाजपा तर्फे अभिवादन..! डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली : बबनराव चौधरी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर भाजपा तर्फे अभिवादन..! डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली : बबनराव चौधरी
शिरपूर प्रतिनिधी :भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती शिरपूर शहर व तालुका भाजपा तर्फे साजरी करण्यात आली.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारे असून,भारताच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे.
अशा या थोर महापुरुषांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल असे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले. शिरपूर येथील भाजपा कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे प्रियदर्शनी सुतगिरणी चेअरमन भुपेशभाई पटेल व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी,तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील,अनु.जाती मोर्चा मा.जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार यांनी हि आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मा.जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, ता. सरचिटणीस जितेंद्र सुर्यवंशी, ता. चिटणीस सुनिल चौधरी, महेंद्र पाटील, मुबीन शेख, माजी नगर सेवक बापु थोरात, रफीक तेली,अनिल आखाडे,सुरेश अहिरे, भिमराव मोरे, संजय चौधरी, विक्की चौधरी, दिनेश पाटील वनावल, प्रमोद भोंगे, बापु पाटील,संतोष माळी,श्रीकृष्ण शर्मा, राधेश्याम भोई,नंदु माळी,रविंद्र सोनार,जितेंद्र माळी,मनोज भावसार, अशोक माथणे,अजिंक्य शिरसाठ, राजुलाल मारवाडी,योगीराज बोरसे, रमेश चौधरी, जितेंद्र थोरात,स्वप्निल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक,दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोध्दा,उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव होते. त्यांचा "शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा" हा संदेश सर्वांनी आत्मसात करावा. उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र राज्यशास्त्र,समाजशास पत्रकारिता,जलसंधारण अशा अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. त्यांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे.
त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. आणि आजही त्यांचे लिखाण हे सर्वांनाच मार्गदर्शक असल्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी शेवटी सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा