Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ मे, २०२२

तोदे येथे 23 वर्षीय युवकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची दुर्दैवी घटना



शिरपूर प्रतिनिधी:शुक्रवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत 23 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील तोंदे येथे उघडकीस आली आहे.याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

निलेश ज्ञानेश्वर ठाकरे वय 23 रा तोंदे ,ता. शिरपूर असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.शिरपूर तालुक्यातील तोंदे गावातील निलेश ज्ञानेश्वर ठाकरे या 23 वर्षीय युवकाचा शुक्रवारी 6 मे 2022 रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरातील छताच्या लाकडी सऱ्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.निलेश ठाकरे याचा मृतदेह खाली उतरवून चुलत काका सुरेश किरण ठाकरे यांनी उत्तरीय तपासणी साठी शिरपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

डॉक्टर कदम यांनी तपासणी करून निलेश ठाकरे मयत घोषित केले . याप्रकरणी वार्डबॉय च्या खबरीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध