Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ मे, २०२२

श्रीमती पी एन दोषी महिला महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या जल्लोषात साजरा....



अक्षय कदम: मुंबई  घाटकोपर येथील एस पी आर जैन कन्याशाळा संचालित श्रीमती पी एन दोषी महिला महाविद्यालयात महाराष्ट्र दिन 2022 उत्सव सोहळा सप्तसूर संगीत स्वरात थाटात संपन्न झाला सदर उत्सव सोहळा कॉलेजच्या प्राचार्य डॉ आशा मेनन यांच्या प्रोत्साहनातून यशस्वीरित्या पार पडला.प्रथम सकाळी प्राचार्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहनचे आयोजन केले गेले होते. 

त्या अनुसंधान कॉलेजच्या एन सी सी विद्यार्थिनींनी ध्वजा समोर परेड करून ध्वजास सलामी दिली आणि ध्वजारोहण पार पडले.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कॉलेजच्या गुणीजन शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उल्लेखनीय आणि अविस्मरणीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून सादरीकरण केले.शिक्षकेतर कर्मचारी राजेंद्र सावंत यांनी जय जय महाराष्ट्र माझा, शूर आम्ही सरदार ही वीरगीते गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

शिक्षकवर्गानीही भावगीते,समूहगीत सादर करून कार्यक्रमाची रंगत द्विगुणी केली.डॉ प्रा सविता चव्हाण यांनी विठ्ठलाचे भक्तीभाव अभंग गाऊन कार्यक्रमात गोडवा आणला.सभागृहाचे मॅनेजर जॉन पुष्पराज यांनी उत्तमरित्या सजावट करून कार्यक्रमाला शोभा आणली.सदर कॉलेजचा महाराष्ट्र दिन सोहळा पारंपरिक पद्धतीत आणि वेशभूषेत कौतुकास्पद पार पडला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध