Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ मे, २०२२

मोहाडी पोलिस स्टेशन धुळे यांची धडक कारवाई



धुळे प्रतिनिधी: दि .३०/०४/२०२२ रोजी मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि बी.आर.कोते यांना गुप्त बातमी मिळाली की,मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र .३ वरुन मालट्रक क्र.एम.एच. - ०४ / एफ.जे. -७७४७ या वाहनातून धुळेकडून मालेगांवकडेस बेकायदा गुरांची वाहतुक होत आहे. 

मिळालेल्या माहितीवरून सपोनि कोते यांनी पथकास सदरची माहिती देवून बातमीची खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशित केले.त्याप्रमाणे पथकाने मोहाडी पो.स्टे.हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र .३ वर पेट्रोलींग करून पाळत ठेवली असता लळींग घाटात मालट्रक क्र.एम.एच. - ०४ / एफ.जे. - ७७४७ हे वाहन धुळेकडून मालेगांवच्या दिशेने येतांना दिसले.पोलीस पथकाने बातमीप्रमाणे सदर वाहन थांबवून त्यातील वाहन चालक यास वाहनात काय माल आहे याबाबत विचारपूस करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलीसांनी सदर वाहन चेक केले असता त्यात एक मोठया ताडपत्रीखाली एकुण २२ गोवंश जातीची गुरे कोंबून,दाटीवाटीने वेदना व यातना होतील अशा रितीने बांधून ठेवून त्यांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले,

म्हणून पोलीस पथकाने सदर वाहनातील इसम नाआला ( १ ) चालकू मोहम्मद इस्त्राईल मोहम्मद इद्रीस वय ५४ वर्षे व्यवसाय चालक रा . गट नं . १० , प्लॉट नं . ४ ,पवारवाड़ी मालेगांव जि.नाशिक ( २ ) क्लिनर शेख शाहीद शेख सादीक वय २३ वर्षे व्यवसाय क्लिनर रा.कमालपुरा सर्वे - नं .१५ ,मालेगांव जि.नाशिक ( ३ ) मजुर मुस्तफा खान हमीद खान वय ३० वर्षे व्यवसाय मजुरी रा.कमालपुरा सर्वे नं . १५ ,मालेगांव जि.नाशिक यांना वाहनासह ताब्यात घेवून वरील इसमांविरुध्द पोकॉ / ४० ९ मुकेश जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला,

असून सदर वाहनातील एकुण ३,२,००० ( तीन लाख दोन हजार रुपये ) किंमतीची २२ गुरे तसेच १० लाख रुपये किंमतीचा मालट्रक असा एकुण १३ , २००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदर वाहनातील गुरांना संगोपन व देखभालीसाठी गोशाळेत दाखल करण्यात आले आहे . वरील कारवाई श्री . प्रविणकुमार पाटील पोलीस अधीक्षक सो, धुळे ,श्री.प्रशांत बच्छाव , अपर पोलीस अधीक्षक सो,धुळे,श्री.ईश्वर कातकाडे , प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी साो ,धुळे शहर विभाग,धुळे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बी . आर . कोते,असई बी.टी. दाभाडे , पोहेकॉ / ११३२ संदीप थोरात ,पोना १६२६ बाबुलाल माळी , पोना / ३६ किरण कोठावदे , पोकॉ / ४० ९ मुकेश जाधव यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध