Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ मे, २०२२

शिंदखेडा तहसिलदार यांच्या धर्म पत्नी सौ. वैशाली सौदांणे यांचे आपल्या दोन मुलांसह आमरण उपोषण सुरु. आज उपोषणाचा दुसरा दिवस. पहिली पत्नी हायात असतांना दुस-या स्त्रीशी अनैतिक संबंध



शिंदखेडा तहसिलदार यांच्या धर्म पत्नी सौ.वैशाली सौदांणे यांचे आपल्या दोन मुलांसह आमरण उपोषण सुरु.आज उपोषणाचा दुसरा दिवस.पहिली पत्नी हायात असतांना दुस-या स्त्रीशी अनैतिक संबंध व त्यातून एक अपत्यांचा जन्म. सदर अपत्यांना पिता म्हणून आपले नाव दिलेले आहे.  

यामुळे महाराष्ट्र शासनाच्या लहान कुटूंबाच्या प्रमाणपत्राचे सरळसरळ उल्लंघन, तरी खुद्द दंडाधिकारी सारख्या जबाबदार पदांच्या व्यक्तीस प्रशासकिय यंत्रणेकडून दिले जात आहे अभय.  शिरपुर उपविभागीय अधिकारी यांच्या चौकशी अहवालानुसार तहसिलदार शिंदखेडा यांना चार अपत्य असल्याचे स्पष्ट केले आहे.  

सदर अहवालानुसार कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फ़त महसूल मंत्रालय व आयुक्त यांच्याकडे चौकशी अहवाल दाखल केलेला असून मात्र त्यावर आजपावतो कोणतीही कार्यवाही होत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाच्या लहान कुटूंबाच्या प्रमाणपत्राचे सरळसरळ उल्लंघनाबाबतची कार्यवाही होत नाही, व न्याय मिळत नाही तो पर्यत सौ. वैशाली सौदांणे यांचे आपल्या दोन आपत्यासह बेमुदत आमरण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध