Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
" बुलढाणा येथील बँक कर्मचाऱ्यांच्या बाबत बँकेने शासनाची दिशाभूल केली असल्याचा आरोप" ८० वर्षाच्या मातेसह सुरू केलेल्या धरणे आंदोलनास ऑफ्रोह राज्य पदाधिकाऱ्यांची भेट
" बुलढाणा येथील बँक कर्मचाऱ्यांच्या बाबत बँकेने शासनाची दिशाभूल केली असल्याचा आरोप" ८० वर्षाच्या मातेसह सुरू केलेल्या धरणे आंदोलनास ऑफ्रोह राज्य पदाधिकाऱ्यांची भेट
बुलढाणा दि ३ मे २०२२( प्रतिनिधी)
जातीचे प्रमाणपत्र रद्द झाले नसतांनाही १४ वर्षापूर्वी सेवेतून कमी केलेल्या बुलढाणा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १३ सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना अधिसांख्य पदावर घेण्याच्या शासनाच्या निर्णयानंतर २७ महिन्यानंतरही सेवेत न घेतल्याने 'ऑफ्रोह' संघटनेचे राज्य सदस्य चंद्रभान सोनुने व त्यांची ८० वर्षाची आई श्रीमती समिंद्राताई सोनुने आणि इतर १२ आदिवासी कर्मचाऱ्यांनी 'ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र (ऑफ्रोह)' तर्फे दि १ मे २०२२ पासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनास आज दिनांक ३ मे २०२२ रोजी ऑफ्रोह राज्य पदाधिकारी व अमरावती येथील जिल्हा शाखेच्या सदस्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला व आर्थिक मदत केली.
चंद्रभान सोनुने व त्यांच्या आई श्रीमती समिंद्राताई शामराव सोनुने यांच्यासह बँकेचे इतर ११ सेवा समाप्त कर्मचारी यांचा पुष्पहार घालून व शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कर्मचाऱ्यांनी आर्थिक परिस्थिती मुळे उघड्यावर झाडाखाली आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे मंडप, बॅनर आणि इतर खर्चासाठी रू. ७५००/- मदत देण्यात आली.
यावेळी बोलतांना राज्य मार्गदर्शक डॉ दीपक केदार (निवृत्त सहसंचालक, कोषागारे विभाग) म्हणाले की,आपल्या मुलांच्या रक्षणासाठी ज्यावेळी माता स्वरूप शक्ती पुढे येते त्यावेळी शत्रू चा पराजय होतो.यावेळी चंद्रभान सोनुने यांची माता समींद्राताई सोनुने या आंदोलनात उतरल्या मुळे निश्चितपणे यश मिळणार आहे.जंगलात ज्याप्रमाणे आपल्या बछड्याच्या संरक्षणासाठी माता पुढे येऊन हल्लेखोर प्राण्याला नामोहरम करते. त्याप्रमाणे यावेळी बँकेचे अधिकारी नामोहरम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २००९ साली अनु जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष संदीप धुरवे यांच्या दबावा खाली येऊन बँकेने या कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध झाले नसतांनी १३ कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले होते.
यापैकी एका कर्मचारी चे जात प्रमाणपत्र वैध असल्याने त्याला कामावर घेण्यात आले तसेच ५/६ कर्मचाऱ्याचे जात प्रमाणपत्र वैध किंवा अवैध करण्यात आले नाही. ही बाब बँकेच्या अधिकाऱ्यांनी शासनापासून लपवून ठेवली आहे. या बाबीची चौकशी होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे काश्मीर मधील कलम ३७० चा गैर वापर करून काश्मीर मधील ब्राम्हण, हिंदू लोकांचा छळ करून या लोकांना हुसकावून लावण्यात आले, त्याच प्रमाणे महाराष्ट्रात २००० च्या कायद्याचा गैर वापर करून अनेक जातींना आदिवासी जमातीच्या यादीतून हुसकावून लावण्यात आले आहे. त्यामूळे भारत सरकारने पुढाकार घेऊन ज्या पद्धतीने संविधानातील काश्मीर बाबतचे कलम ३७० हटविण्यात आले, त्या प्रमाणे महाराष्ट्रातील २००० चा जातीचा कायदा सुध्दा हटविणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी राज्य कोषाध्यक्ष मनीष पंचगाम, अमरावती जिल्हा अध्यक्ष यशवंत वरूडकर, सचिव नरेंद्र ढोलवाडे, सदस्य रतन नाथे, हे उपस्थित होते.यावेळी त्यांनी तसेच चंद्रभान सोनुने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीमती समिंद्राताई सोनुने यांनी बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या,"चंद्रभान सारखीच ही १२ कर्मचारी सुध्दा माझीच मुले आहे. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी ही माझीच आहे. नोकरी गेल्यापासून ही मुले आपला संसार कसा चालवत असेल याची मला कल्पना आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांना सदबुध्दी मिळून त्यांनी या मुलांना कामावर घ्यावे, एवढीच अपेक्षा आहे."
यावेळी ऑफ्रोह बुलढाणा जिल्हा महिला शाखा अध्यक्ष श्रीमती पुष्पा कोळी यांनी आभारप्रदर्शन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा